शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीपोटी जॅग्वार कार न देणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण करून खून; डेडबॉडीचे तुकडे धरणात फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:16 IST

बांधकाम व्यावसायिकाच्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार अटकेत

- किरण शिंदे पुणे : सिंहगड पायथा परिसरातून शासकीय ठेकेदार, बांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून खून करणारा मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोल्हापूर येथून अटक केली. पोळेकर खूनप्रकरणात भामे गेले दोन महिने पसार होता.सिंहगड पायथा परिसरातील डोणजे गावातील पोळेकरवाडीत विठ्ठल सखाराम पोळेकर (७०) राहायला होते. आरोपी योगेश भामे हा डोणजे परिसरात राहायला आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्याने पोळेकर यांच्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी भामे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांनी पोळेकर यांचे कारमधून अपहरण केले. तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्यावर वार करून खून केला. खून केल्यानंतर अवयव खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात टाकून दिले होते. याप्रकरणात भामे याचे साथीदार शुभम पोपट सोनवणे (२४, रा. चिंचली गुरव, जि. अहिल्यानगर) आणि मिलिंद देवीदास थोरात (२४, रा. बेलगाव, अहिल्यानगर) यांना यापूर्वीच अटक केली होती. मुख्य सूत्रधार भामे पसार झाला होता. गेले दोन महिने त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.भामे कोल्हापूर येथे वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बुधवारी (दि. ८) पत्रकार परिषदेत दिली. पोळेकर यांच्या खुनामागचे नेमके कारण काय? फरार झाल्यानंतर तो कुठे वास्तव्यास होता? त्याला आश्रय काेणी दिला, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक निरीक्षक कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सागर पवार, उपनिरीक्षक अभिजित सावंत, संजय सुलनासे, रामदास बाबर, राजू मोमीन, अतुल डेरे, अभिजित एकशिंगे, मंगेश थिगळे, अमोल शेडगे यांनी ही कारवाई केली.  आश्रयदाते होणार सहआरोपीबांधकाम व्यावसायिक विठ्ठल पोळेकर खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार गुंड योगेश भामे गेले दोन महिने फरार होता. त्याला आश्रय देणारे, तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना सहआरोपी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आज संपूर्ण प्रकार घडला होता. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ माजली होती. पोलिसांनी हा गुन्हा घडल्यानंतर दोन आरोपींना अटकही केली होती. मात्र मुख्य आरोपी योगेश उर्फ बाबू किसन भामे हा फरार होता. दोन दिवसांपूर्वी आरोपी हा कोल्हापुर येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सातारा पुणे रस्त्यावरील सारोळा पुलाजवळून अटक केली. आरोपी योगेश भामे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारखे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची रवानगी सध्या पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.- पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण)

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय