शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:05 IST

पूर्णवेळ सेवेत समाविष्ट करण्याची मागणी 

ठळक मुद्दे साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातून केली मागणी

पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक उपायजोजना करण्यासाठी तसेच रूग्णांना सेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर्सवर कंत्राटी पद्धतीने आराेग्य कर्मचाऱ्यांची भरती तीन महिन्यांसाठी करण्यात आली होती. त्यांना कार्यमुक्त केल्याने जवळपास २०० कर्मचाऱ्यांनी कायमस्वरूपी सेवेत घेण्याची मागणी करत जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन केले.        साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत तिन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी त्यांची नेमणुक करण्यात आली होती. कोरोना काळात त्यांनी रूग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच त्यांची काळजी घेण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. मात्र, गेल्या काही  दिवसांपासून कोरोना रूग्ण वाढीचा वेग जिल्ह्यात मंदावला आहे. यामुळे अनेक तालुक्यातील कोविड सेंटर बंद करन्यात आली. कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांनाही त्यांची मुदत संपल्याने कार्यमुक्त करण्यात आले. मात्र, त्यांना कायमस्वरूपी कामात घेण्यात यावे या साठी त्यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या धरत धरणे आंदाेलन केले. जिल्हा परिषदेत कुणी निवेदन न स्विकारल्याने आंदोलकांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले.             कोविड १९ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजु करणून घेणे, अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवणे,  कोविड नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ज्यांनी कोविड आरोग्य कर्मचारी म्हणून ९० दिवस काम केले असेल त्यांच्या साठी शासनाने आरोग्य विभागातील सर्व पदासाठी ५० टक्के आरक्षण द्यावे अशा विविध मागन्या या आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाकडे केल्या आहेत

टॅग्स :Puneपुणेzpजिल्हा परिषदcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीagitationआंदोलन