शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

हवेली तालुक्यातील जाहीर केलेले 'कंटेन्मेंट झोन' आठ तासांच्या आत हटवले ; दुकाने, ये- जा करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 6:05 PM

वाघोली व मांजरी बुद्रुक हद्दीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, ही बंदी उठवण्यात येत असल्याचे केले जाहीर

ठळक मुद्देदुकाने, खासगी कार्यालय सकाळी नऊ ते सांयकाळी पाच या दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी

पुणे(लोणी काळभोर) : पुणे व पिंपरी चिचवड शहरातुन वरील चार गावात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आज (शनिवार) पहाटे पाच वाजल्यापासुन येत्या शुक्रवारी (दि. 12 ) रात्री बारा वाजेपर्यत, अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांना कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह नऱ्हे या चार गावात शनिवारी ( दि. 6 ) पहाटेपासुन ये -जा करण्यास घालण्यात आलेली बंदी आठ तासांच्या आत हटवावी लागली आहे. वाघोली व मांजरी बुद्रुक हद्दीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, ही बंदी उठवण्यात येत असल्याची घोषणा हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी केली आहे.        हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह नऱ्हे या चार गावात यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारचे शासकीय, प्रशासकीय व खासगी अधिकारी व कर्मचारी यांना आज (शनिवार) पासुन सात दिवस, वरील चार गावात येजा करण्यास बंदी घातली होती. मात्र, वाघोली व मांजरी बुद्रुक या दोन्ही गावात सकाळपासुनच कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळताच, बारवकर यांनी वरील आदेश रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.  कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, वाघोली, मांजरी बुद्रुकसह हवेली तालुक्यातील आठ ठिकाणचा कंटेन्मेट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) शनिवार ( दि. 6 ) पासुन हटविण्यात आला आहे. यामुळे वरील आठ गावात दुकाने, खासगी कार्यालय व व्यापारी दुकाने सकाळी नऊ ते सांयकाळी पाच या दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी असल्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.       कोरोनाचे रुग्ण आढळुन आल्याने मागील अठ्ठावीस दिवसांपूर्वी फुरसुंगी गावठाण, हांडेवाडी गावठाण, कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा-गाढवेमळा, वाघोली ग्रामपंचायत हद्दीतील केसनंद-जोगेश्वरी रस्ता-सदुगुरु पार्क, भिलारवाडी, खानापुर, मांजरी बुद्रुक हद्दीतील झेड कॉर्नर व कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीमाळवाडी अशा आठ ठिकाणे कंटेन्मेट झोन (प्रतीबंधीत क्षेत्र) म्हणुन जाहीर केली होती. मात्र वरील आठही ठिकाणचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊन, घरी परतल्याने शनिवारपासुन वरील आठ ठिकाणचे प्रतिबंधीत क्षेत्र हटविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देतांना सचिन बारवकर म्हणाले, मांजरी बुद्रुक व वाघोली हद्दीत येजा करण्याबाबतची बंदी कायम ठेवल्यास, मांजरी बुद्रुक व वाघोली हद्दीत कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती निर्माण होऊ शकतो अशी माहिती हडपसर व लोणीकंद पोलिसांनी दिल्याने, वरील चार गावात ये- जा करण्याबाबत घातलेली तात्काळ उठविण्यात आली आहे. मांजरी बुद्रुक गावात जास्त परिस्थिती स्फोटक बनल्याने, पोलिसांनी वरील विनंती केली होती.

हवेली तालुक्यातील सध्याची सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे:मांजरी बुद्रुक (महादेवनगर, गोडबोलेवस्ती, भंडलकरनगर, अनाजी वस्ती, घुले वस्ती, म्हसोबा वस्ती, भापकर मळा, गोपाळपट्टी- टिळेकर कॉलनी), वाघोली (आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, झेड रेसिडेन्सी, गणेशनगर, बायफ रस्ता, धुत कंपनी परीसर, उबाळेनगर), न?्हे (गोकुळनगर, नवदिप सोसायटी ते देवश्री कोम्पलेक्स, कंजारवस्ती कृष्णाईनगर, सिध्दीविनायक अंगण सोसायटी), वाघोली (गणेशपार्क कावडेवाडी), बकोरी (प्रिस्टीन सिटी), मांजरी बुद्रुक (शिवजन्य सोसायटी), कदमवाकवस्ती (स्वामी विवेकानंद नगर, चांदने वस्ती), आंळंदी म्हातोबाची (पानमळा), पिसोळी (गगणनगर), मांजरी खुर्द (पवार वस्ती), कोरेगाव मुळ (गावठाण), होळकरवाडी (झांबरे वस्ती-तुपे प्लॉटींग), कोंढवे-धावडे )खडकबाग एनडीए गेटसमोर) व शिंदेवाडी-जगतापवाडी.  

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavalkishor Ramनवलकिशोर राम