राष्ट्रीय ग्रंथ म्हणून संविधानाचे वाचन व्हावे : तांबोळी
By Admin | Updated: February 16, 2016 01:32 IST2016-02-16T01:32:32+5:302016-02-16T01:32:32+5:30
‘‘देशाचे सामाजिक स्वास्थ्य, सार्वजनिक शांतता, सर्व-धर्माच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला चोख उत्तर देण्यासाठी समाज निर्माण करावा लागेल.

राष्ट्रीय ग्रंथ म्हणून संविधानाचे वाचन व्हावे : तांबोळी
खळद :‘‘देशाचे सामाजिक स्वास्थ्य, सार्वजनिक शांतता, सर्व-धर्माच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला चोख उत्तर देण्यासाठी समाज निर्माण करावा लागेल. यासाठी राष्ट्रीय ग्रंथ म्हणून सर्वांनी संविधान वाचण्याची गरज आहे,’’ असे विचार सत्यशोधक मुस्लिम मंडळाचे प्रा. शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केले.
खानवडी येथे समता कृती प्रतिष्ठानच्या वतीने ह्यसमतागौरवह्ण पुरस्काराने विविध क्षेत्रांतील मान्यरांना सन्मानित करण्यात आले. या वेळी तांबोळी बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. राहुल कदम होते. या वेळी नीरा मार्केट कमिटीचे उपसभापती ईश्वर बागमार, संचालक सुनील धिवार, पूनम बनकर, विलास आढाव, सुधाकर जगदाळे, रामदार होले, चंद्रकांत फुले, संगीता जोशी, दीपक हिवरकर, राजाभाऊ जगताप, सुधाकर गिरमे, दत्ता भोंगळे, गणेश मुळीक, छाया नानगुडे, सुजाता गुरव, वसंतराव ताकवले, रवींद्र कामथे, नाना लांडगे, रामभाऊ वढणे, माऊली घारे, राजेंद्र कुंजीर, दिलीप नेवसे, वसंतराव ताकवले, इस्माईल सय्यद, पांडुरंग जाधव, हनुमंत वाबळे, शानबाग, सिद्राम कांबळे, रामचंद्र भोसले, संदीप चाचर, सोमनाथ शेंडगे, महेश माने आदी उपस्थित होते. या वेळी कर सहायक अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल पूनम बनकर यांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना शिक्षणगौरव - बाजीराव राऊत, प्रकाश टेके, संजय धुमाळ, तानाजी झेंडे, रामप्रभू पेटकर, रूपाली पिसाळ, वैशाली पवार, पत्रकारिता - सुनील लोणकर. समाजभूषण - नंदकुमार दिवसे, शहाजी लोणकर, भगवान लोंढे. कृषिभूषण - रवींद्र दळवी. उद्योगरत्न - भारत अधिकारी. महसूल सेवा - सुधीर बडदे. कविरत्न - बबन चखाले याप्रमाणे समतागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संयोजन अॅड. सचिन कदम, दादासाहेब फडतरे, अश्विनी कदम, पंढरीनाथ जाधव, संदीप जगताप यांनी केले.