Pune: कैद्यांनीच केला हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर; येरवडा कारागृहातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 11:01 IST2024-05-08T11:01:14+5:302024-05-08T11:01:49+5:30
याप्रकरणी तीन कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Pune: कैद्यांनीच केला हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर; येरवडा कारागृहातील घटना
पुणे : येरवडा कारागृहातील कैद्यांनी हवालदारावर हल्ला केल्याची घटना घडली. कैद्यांनी काठीने मारहाण केल्याने हवालदाराचे मनगट फ्रॅक्चर झाले आहे. नानासाहेब मारणे असे जखमी झालेल्या हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी तीन कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मारणे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मारणे रविवारी येरवडा कारागृहात गस्त घालत होते. कारागृहातील सी. जे. विभागात नवीन प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. तेथे दगडी भिंत बांधण्यात आली आहे. भिंतीचे काम सुरू असल्याने या भागातून ये-जा करण्यास मनाई करण्यात आली आहे. कारागृह रक्षक मारणे तेथे थांबले होते. तेथून तीन आरोपी निघाले होते. मारणे यांनी तिघांना तेथून जाण्यास मनाई केली. भिंतीचा दगड लागल्यास इजा होईल, असे त्यांनी सांगितले.
कैद्यांना मारणे समजावून सांगत असतानाच त्यांनी मारणे यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली. त्यांना काठीने मारहाण केली. मारणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारणे यांच्या मनगटावर काठीचा घाव बसल्याने त्यांचे मनगट फ्रॅक्चर झाले. सहायक पोलिस निरीक्षक विनायक अहिरे तपास करत आहेत.