शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दौंडमध्ये 'त्यांचा' संसार अधिकृत करण्यासाठी लाच घेणारा वैद्यकीय अधिकारी ACB च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 20:05 IST

दौंड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यासह शिपायाला घेतले ताब्यात...

दौंड (पुणे) : दौंड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे ( वय ४६ )आणि त्यांच्या कार्यालयचा शिपाई, नानासाहेब पांडुरंग खोत ( वय ५७) यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.

दरम्यान या संदर्भात रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराने दुपारी विवाह नोंदणीसाठी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. दरम्यान हे प्रमाणपत्र देण्यासाठी डॉ. संग्राम डांगे यांनी पाच हजार रुपये मागितले होते. ग्रामीण भागात विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे अधिकार वैद्यकीय अधिकाऱ्यांना असतात.

तक्रारदार पाच हजार रुपये घेऊन आला असता यावेळी डॉ. संग्राम डांगे आणि नानासाहेब खोत यांना पाच हजार रुपये घेताना रंगेहात पकडले. शिपायाने पाच हजार रुपये घेतले तेव्हा लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शिपायाला रंगेहात पकडले. त्यानुसार दोघांवर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ माने, दिनेश माने, भूषण ठाकूर, प्रकाश तावरे सहभागी झाले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नdaund-acदौंड