शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पुणेकरांना तूर्तास दिलासा; पण कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर कडक निर्बंध आणणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 15:11 IST

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहे.

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संकट पुन्हा एकदा डोके वर काढू लागले आहे. बुधवारी पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्या आसपास पोहचली होती. गुरुवारी पण कालचीच पुनरावृत्ती आढळून आली असून दुपारपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा ५ हजारांच्या आसपास पोहचला आहे. याच धर्तीवर प्रशासनाकडून पुणेकरांवर कठोर निर्बध आणण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा सुरु होती. मात्र तूर्तास पुणेकरांना प्रशासनाने दिला दिला असून आगामी काळात जर कोरोना रुग्णांची वाढ नियंत्रणात आली नाही तर कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे स्प्ष्ट संकेत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महपौर मुरलीधर मोहोळ यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी  निर्बंध वाढीवर भाष्य केले. मोहोळ म्हणाले, कोरोना रुग्णांची वाढती लक्षात घेता शहरातील सार्वजनिक वाहतूक, स्विमिंग पूल यावर निर्बंध लावण्याची चर्चा झाली. जम्बो हॉस्पिटलमध्ये २०० बेड वाढविण्यात येणार आहे. तसेच कोरोना चाचण्या वाढवण्यावर देखील भर देण्यात येणार आहे. लसीकरण आणि चाचण्या योग्य प्रकारे झाल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही. बसमध्ये ५० टक्के क्षमतेने प्रवास करता येणार आहे. 

कोरोना रुग्णांची वाढ कायम राहिली तर नाईलाजास्तव कडक निर्बंध आणावे लागणार 

कोरोना रुग्णांची वाढ कायम राहिली तर नाईलाजास्तव कडक निर्बंध आणावे लागणार आहे. शहरातील उद्याने, जलतरणतलाव, पीएमपी बससेवा, सिनेमा गृहे, मॉल यावर नक्कीच बंधने आणावी लागतील तसेच शहरातील दुकाने देखील ठराविक वेळेत सुरु ठेवण्याचा विचार होऊ शकतो. 

पुणे महानगरपालिका आणि क्षत्रिय कार्यालयात होणारी गर्दी हे काळजीचे कारण आहे. आरोग्य सुविधा वाढवणे हा एकच पर्याय असेल. लॉकडाऊन करणे हा उपाय नाही. सध्या काळात गृहविलगीकरणात ८० टक्के कोरोना रुग्ण उचार घेत आहे. लसीकरण प्रक्रियेचा १०० केंद्रावरून २ लाखांचा टप्पा पूर्ण होत आहे. लसीकरण वाढवण्याची भूमिका असणार आहे. पहिला डोस घेताना कोव्हीशिल्ड की कोव्हक्सिन असा कुठलाही विचार करू नये. 

केंद्राने महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांकडे लक्ष द्यावे. सद्यस्थितीत पुण्यात दिवसाला १० ते १२ हजारांच्या आसपास लसीकरण होत आहे. ते वाढवून ३० ते ४० हजारांमध्ये होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे पूर्ण शहराचे लसीकरण होऊ शकते.  ४००० च्या आसपास बेड आहेत. ते सुद्धा वाढवण्याचे प्रयत्न आहेत. जम्बोमध्ये २०० ऑक्सिजन बेड सुरू करतोय. १६०० बेडचे नियोजन पूर्ण झाले आहे. शहरातल्या आठ ठिकाणी बेड उपलब्ध करत आहोत. चाचण्या वाढवण्यात येणार आहेत.

लॉकडाऊन हा मार्ग नाही. परिस्थिती गंभीर झाली तर लॉकडाऊन करता येईल. आरोग्य सुविधा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे, या सर्व गोष्टी नियोजित केल्यास लॉकडाऊनची वेळ येणार नाही. भविष्यात संख्या वाढली तर अजून कडक निर्बंध करावे लागतील.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौर