शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं ! आघाडीतर्फे काँग्रेस लढवणार पुण्यातून लोकसभा, राष्ट्रवादीने सोडला हट्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 17:33 IST

आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडल्याच्रे समजत आहे

पुणे : आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या लोकसभेच्या जागेचा हट्ट सोडल्याच्रे समजत आहे. सुरुवातीपासून काँग्रेसकडे असणारी ही जागा अखेर त्यांनाच मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंद असला तरी उमेदवार कोण असणार याबाबत मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.           काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादीला पुण्याची लोकसभा लढवण्यात रस असल्याचा बॉम्बगोळा टाकला आणि पुण्यातील आघाडीत एकप्रकारे भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसने मात्र कुठल्याही परिस्थितीत पुण्याची जागा सोडणार नसल्याचे सांगितले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीतील काही अतिउत्साहींनी पुण्यातून कोण उभे राहणार याची यादीही काढली होती. याच गोंधळात अचानक स्वतः शरद पवार पुण्यातून उभे राहणार असल्याची आवई उठली.अखेर खुद्द पवारांनी पुण्यातून उभे राहणार असे स्पष्ट केल्यावर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.                 मात्र सुरु असलेल्या आघाडीच्या जागा वाटप चर्चेत पुण्याची जागा राखण्यात काँग्रेसला यश आल्याचे समजते. अर्थात जागा राखली तरी जागा जिंकणे तितकेसे सोपे नसून भाजप विरोधात तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार उभे करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. सध्या तरी काँग्रेसमधून अनंत गाडगीळ यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असून आगामी काळात इतर नावेही पुढे येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Politicsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस