रोहित टिळक यांच्यासह ५७ काँग्रेस इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:41 PM2019-07-31T14:41:46+5:302019-07-31T14:45:00+5:30

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ काँग्रेसच्याही मुलाखती पार पडल्या आहेत.

congress took interviews for upcoming election | रोहित टिळक यांच्यासह ५७ काँग्रेस इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती 

रोहित टिळक यांच्यासह ५७ काँग्रेस इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती 

Next

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ काँग्रेसच्याही मुलाखती पार पडल्या आहेत. काँग्रेसतर्फे ५७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून त्यात शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह रोहित टिळक, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

   पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहे. त्यामुळे यंदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. त्यातही शहरातील कोणत्याही जागेचे वाटप झालेले नाही. अशावेळी इच्छुकांनी सर्व जागांसाठी मुलाखती दिल्या. माजी खासदार जयवंत आवळे, काँग्रेस सरचिटणीस राजेश वर्मा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांनी यावेळी मुलाखती घेतल्या. काँग्रेसचे महापालिका गटनेते अरविंद शिंदे, ऍड अभय छाजेड, नगरसेवक अविनाश बागवे, रवींद्र धंगेकर, मनीष आनंद, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, दीप्ती चवधरी यांनीही मुलाखती दिल्या.   

Web Title: congress took interviews for upcoming election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.