काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 05:35 IST2018-09-23T05:34:09+5:302018-09-23T05:35:02+5:30

काँग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचा सैनिक आता निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात दिसणार आहे.

 Congress Seva Dal workers wills see in Jinns | काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार

काँग्रेस सेवा दलाचा सैनिक जीन्स अन् झब्ब्यात दिसणार

पुणे - काँग्रेस अंतर्गत काम करणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस सेवा दलाचा सैनिक आता निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात दिसणार आहे. अखिल भारतीय सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांनी महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाºयांच्या मेळाव्यात तशी घोषणा केली. प्रत्येक राज्यात किमान ३ लाख सेवा दल सैनिक तयार करण्याचे उद्दिष्ट असून काँग्रेसला मदत करण्यासाठी सेवा दलातील ही यंग ब्रिगेड काम करेल असे ते म्हणाले.
सेवा दलाचे राज्य अध्यक्ष विलास औताडे यांनी ही बैठक आयोजित केली होती. देसाई म्हणाले, अखिल भारतीय स्तरावर काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यातील प्रमुख निर्णय म्हणजे सेवा दल सैनिकाचा गणवेश आधुनिक करण्यात आला आहे. निळी जीन्स व पांढरा झब्बा अशा वेषात यापुढे सेवा दल सैनिक असेल. प्रत्येक राज्यात किमान ३ लाख सेवा दल सैनिक असतील. काँग्रेस पक्ष स्थापनेच्या दिवशी २८ डिसेंबरला देशात ५ हजार ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

Web Title:  Congress Seva Dal workers wills see in Jinns