शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ‘डीएनए’ एकच : सुप्रिया सुळे 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:36 AM

राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते.  

ठळक मुद्देसोनिया गांधी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धाकॉंग्रेस व राष्ट्रवादी हे केवळ पक्ष नसून हा गोतावळा

पुणे :  स्वयंपाकघर जरी वेगळे असले, तरी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस एकाच घरातील दोन मुले आहेत. राजकारण, समाजकारण किंवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते.  अशावेळी भांडयाला भांडे लागते. मात्र, त्यामुळे आमच्यातील प्रेम काही कमी झालेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा ’’डीएनए’’ एकच आहे. असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.  काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.  सप्ताहात महाविद्यालयीन युवतींना प्रोत्साहन देण्याकरीता आयोजित १९ वषार्खालील महिलांच्या सोनिया गांधी करंडक टी २० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन  स्वारगेट येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सेक्रेटरी सोनल पटेल, मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, कैलास कदम, नगरसेवक अजित दरेकर, वीरेंद्र किराड, काका चव्हाण, मुकारी अलगुडे, रुपाली चाकणकर, विकास टिंगरे, विवेक भरगुडे आदी उपस्थित होते. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, क्रिकेट हा देशाला व देशवासियांना एकत्र आणणारा खेळ आहे. देशामधील सर्वाधिक लोकप्रिय आणि काही क्षणात भारतीयांमध्ये ऐक्य निर्माण करण्याची ताकद या खेळामध्ये आहे. त्यामुळे सप्ताहाच्या माध्यमातून युवतींमध्ये हा खेळ रुजविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे कार्यक्षम महिला म्हणून नेतृत्व सुपरिचित आहे. अजित पवार आणि मोहन जोशी हे दोन्ही दादा राज्यात व प्रशासनात उत्तम काम करीत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी हे केवळ पक्ष नसून हा गोतावळा असल्याचे त्यांनी सांगितले.  सोनल पटेल म्हणाल्या, सोनिया गांधी या शक्तीचे प्रतिक आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहातील सर्व उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत. क्रिडा स्पधेर्सारख्या उपक्रमांतून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी जोमाने पुढे काम करुया, असेही त्यांनी सांगितले. मोहन जोशी म्हणाले, व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन जातीयवादी पक्षांना शक्तीने हरविणे, हा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवायला हवा. युवतींना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याकरीता अशा प्रकारच्या स्पर्धा पुण्यामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेमध्ये आठ संघ सहभागी होणार असून दररोज दोन सामने होणार आहेत. भोला वांजळे यांनी सूत्रसंचालन केले. नीता परदेशी यांनी आभार मानले. 

  

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीSharad Pawarशरद पवार