शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काँग्रेस आघाडीला मिळेना उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 07:00 IST

मनसेच्या उमेदवाराला दिलेला हा पाठिंबा हा स्थानिक नेतृत्वाचा निर्णय

ठळक मुद्देकोथरुडमध्ये मनसेला दिला पाठिंबा

पुणे : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड मतदारसंंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारही मिळत नसल्याची नामुष्की काँग्रेस आघाडी आणि तिच्या घटकपक्षांवर आली. त्यामुळे काँग्रेस आघाडीत प्रवेश न दिलेल्या मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची पाळी आघाडीवर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आव्हान देत पाटील यांच्या विरोधात लढण्याचे सूतोवाच केले होते. मात्र पाटील यांनी कोल्हापुर जिल्ह्यातील मतदारसंघ न निवडता पुण्यातील मतदारसंघ निवडल्यानंतर शेट्टी यांच्या आव्हानातील हवा निघून गेली. त्यानंतर त्यांनी चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना ‘स्वाभिमानी’तर्फे उतरवण्याची तयारी केली. मात्र तरडे आणि पाटील यांच्या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर तोही मुद्दा निकाली निघाला. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोघांकडेही कोथरुडमधून एकाही इच्छूकाने उमेदवारी मागितली नाही.कोथरुडमधील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना पाटील यांच्या विरोधात उतरवण्यासाठी काँग्रेस आघाडीतर्फे प्रयत्न झाले. मात्र त्यालाही यश आले नाही. शेवटी मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय कॉंग्रेस आघाडीने घेतला. राज्यपातळीवर मनसेला काँग्रेस आघाडीत स्थान नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुर्वीच जाहीर केले. मात्र, कोथरुडमध्ये उमेदवारच न मिळाल्याने मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्त्वाने घेतल्याचा खुलासा नंतर करण्यात आला. मनसे उमेदवार शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत शुक्रवारी झाला. भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील मतांमध्ये विभाजन होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. बैठकीला काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, ‘राष्ट्रवादी’चे शहराध्यक्ष चेतन तुपे, ‘राष्ट्रवादी’च्या खासदार वंदना चव्हाण तसेच दोन्ही पक्षांचे आजीमाजी आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. आघाडीच्या जागावाटपात कोथरूड मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे होता. ‘‘चंद्रकात पाटील यांना एकास एक लढत देण्यासाठी आघाडीने हा निर्णय घेतला,’’ असे सांगत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आणि काँग्रेसचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांनी पाठिंब्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. दरम्यान मनसेच्या उमेदवाराला दिलेला हा पाठिंबा हा स्थानिक नेतृत्वाचा निर्णय असून, तो पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघापुरताच मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेElectionनिवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटील