राज्यसभेच्या एका जागेवरून भाजपमध्ये खल ; मातब्बर नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 07:27 PM2020-03-11T19:27:07+5:302020-03-11T22:01:57+5:30

महाराष्ट्रात कोणाचीही नाराजी पत्करणे पक्षाला परवडणारे नसल्याने अद्यापही निर्णय नाही.त्यातच एकदा संधी मिळालेल्यांना पुन्हा संधी दयायची की ज्येष्ठ नेत्यांचे पुनर्वसन करायचे यावर सुरु असल्याचे समजते. 

confusion in the BJP from a Rajya Sabha seat; competition between two leaders | राज्यसभेच्या एका जागेवरून भाजपमध्ये खल ; मातब्बर नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा 

राज्यसभेच्या एका जागेवरून भाजपमध्ये खल ; मातब्बर नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा 

Next

पुणे : राज्यसभेच्या एका जागेवरून भाजपमध्ये मत-मतांतरे असून त्यासाठी मातब्बर नेत्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यातच एकदा संधी मिळालेल्यांना पुन्हा संधी दयायची की ज्येष्ठ नेत्यांचे पुनर्वसन करायचे यावर खल सुरु असल्याचे समजते. 

  

राज्यसभेच्या या महिन्याच्या अखेरीस असणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रातून तीन जागा रिक्त होणार असल्याने तिसऱ्या जागेबाबत खल सुरु असल्याचे समजते.  

 दुसरीकडे पक्षात ज्येष्ठ मानले जाणारे आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेले एकनाथ खडसे यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र भाजपकडून अचानकपणे एखादे नाव पुढे येऊ शकते. चारही पक्षांकडे असलेली अतिरिक्त मते वळवण्याची क्षमता असणारा नेताच उमेदवार होऊ शकतो. त्यामुळे पक्ष कोणाच्या नावाचा विचार करणार हेच बघणे निर्णायक ठरणार आहे. 

Web Title: confusion in the BJP from a Rajya Sabha seat; competition between two leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.