शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने संगणक अभियंता महिलेचे अपहरण करुन लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 21:49 IST

ही महिला बंगलुरु येथील एका नामांकित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते.

ठळक मुद्देगुगल पेवरुन पैसे घेतले काढून : कटरने कापले दागिने

पुणे : कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने एका संगणक अभियंता महिलेचे अपहरण करुन हात पाय बांधून तोंडात कापडी बोळा घालत लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी आरोपींनी महिलेकडील सोन्याचे दागिने कटरने कापून घेण्यात आले़ तसेच गुगल पे व एटीएम कार्डमधून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. त्यानंतर महिलेला कारमध्ये शीटला बांधलेल्या अवस्थेतच सोडून आरोपी पळून गेले.याप्रकरणी साळुंखे विहार येथील एका ३५ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसांनी राजेशसिंग (रा. बालाजी निवास, सांळुखे विहार) व त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला बंगलुरु येथील एका नामांकित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करते. सुट्टीमध्ये तीन आठवड्यापूर्वी त्या आई वडिलांकडे साळुंखे विहार येथे आल्या. त्यांच्या वडिलांनी गाडी शिकविण्यासाठी त्यांच्या ओळखीच्या राजेश सिंग याला सांगितले. राजेश सिंग हा तिला काही दिवस कार चालविण्यास शिकवत होता. दरम्यान, या महिलेचे आईवडिल कामानिमित्त हैद्राबादला गेले होते.

राजेश सिंग हा एका मित्रासह मंगळवारी साडेआठ वाजता त्यांच्या घरी गेला. कार शिकविण्यासाठी त्यांना बरोबर घेत वाटेत मित्राला सोडवायचे असल्याचे सांगून त्यालाही गाडीत घेतले. त्यांना पिसोळी येथे नेण्यात आले. मात्र गाडी बंद पडू लागल्याने राजेश गाडी चालविण्यास बसला. त्याने पैशाची गरज असल्याचे सांगून त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा त्यांनी घरी गेल्यानंतर पैसे देते, असे सांगितले. त्यावर राजेश सिंग याने पैसे आताच पाहिजे, असे म्हणाला. त्याच्या मित्राने या महिलेचे हात मागच्या बाजूला ओढून कपड्याने बांधून ठेवले. महिलेने आरडाओरडा करुन नये, म्हणून रुमालाचा बोळा त्यांच्या तोंडात कोंबून त्यावर मास्क लावला. आरोपींनी त्यांच्या गुगल पेमधून ४० हजार रुपये ट्रान्सफर करुन घेतले. त्याच्या साथीदाराने महिलेच्या घराची चावी घेऊन दुसऱ्या वाहनाने जावून घरातून तिची पर्स घेऊन आला. तिच्याकडून एटीएमचा पासवर्ड घेऊन १० हजार रुपये स्वत: काढून आणले. आरोपींनी त्यांच्या हातातील तीन अंगठ्या निघत नसल्याने कटर आणून त्या कापून काढून घेतल्या. त्यानंतर त्यांना गाडीत बांधलेल्या स्थितीत ठेवून ते पळून गेले.

त्यानंतर या महिलेने हात सोडवून घेत गाडी घेऊन घरापर्यंत आल्या. आईवडिलांना फोन करुन पोलिसांकडे धाव घेतली. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने आरोपींचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :PuneपुणेcarकारPoliceपोलिसWomenमहिलाKidnappingअपहरण