शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘कंटेन्मेंट झोन’ नियम धाब्यावर बसवून खासगी शाळेकडून फी व पुस्तक खरेदीसाठी पालकांना शाळेत येण्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:17 IST

शाळेकडून पालकांना सोमवारपासून शालेय फी व पुस्तक खरेदीसाठी सकाळी १० ते १२ या दरम्यान सुरू राहणार असल्याचा संदेश

ठळक मुद्देखासगी शाळेने स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासनाने घेतलेली नव्हती कुठलीही लेखी मान्यता

बिबवेवाडी: पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून अनेक ठिकाणी कंटेन्मेंट झोन केले असून त्या परिसरात औषधांची दुकाने सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, शाळा बंद करण्यात आले आहे. जेणेकरून नागरिकांची गर्दी कमी होऊन सामाजिक अंतर राखून करोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकतो. परंतु, बिबवेवाडी येथील एका खासगी शाळेने मात्र कंटेन्मेंट झोन असूनही पालकांना दूरध्वनी वरून शाळेची पुढील वर्षाची शालेय फी , पुस्तके खरेदी व शालेय प्रवेशाचे फॉर्म वाटप सुरू केले असल्याचे संदेश मिळाल्यामुळे नागरिकांनी शाळेत गर्दी केली होती.   या खासगी शाळेकडून पालकांना सोमवारपासून शालेय फी व पुस्तक खरेदी साठी सकाळी १० ते १२ या दरम्यान सुरू राहणार असल्याचा संदेश पाठवण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीमुळे कुठलेही सामाजिक अंतर राखले जात नव्हते. तसेच शाळा प्रशासनाकडून याबाबतीत कुठलीही यंत्रणा राबवण्यात आली नव्हती.या शाळेच्या परिसरात कुठेही निजंर्तुकीकरण करण्याची सोय केलेली नव्हती.बिबवेवाडीतील या खासगी शाळेने स्थानिक प्रशासन व पोलिस प्रशासनाने कुठलीही लेखी मान्यता घेतलेली नव्हती.   या सर्व प्रकारामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मनस्ताप करावा लागत आहे. कारण या शाळेतील विद्यार्थी बिबवेवाडी च्या आजूबाजूला असलेल्या परिसरातून येत असल्यामुळे त्यांच्या परिसरातून बिबवेवाडी येथील शाळेच्या परिसरात येताना त्यांना अनेक रस्ते बंद केले असल्यामुळे अनेक अग्निदिव्यातून शाळेत पोहचावे लागत होते. परंतु पाल्याच्या भविष्याच्या चिंतेमुळे पालकांना शाळेच्या भोंगळ कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.शालेय फी व शालेय प्रवेशासाठी शाळेने ऑनलाईन यंत्रणेचा वापर करता आला असता परंतु शाळा प्रशासनाने प्रशासना कडून कुठलीही परवानगी न घेता कॅनतेंमेंत झोन चे सर्व नियम धाब्यावर बसवून पालकांना शाळेत फी भरण्यासाठी बोलवण्यात आले होते..............................................................................

टॅग्स :BibvewadiबिबवेवाडीSchoolशाळाStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस