शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुजा सकट आत्महत्येप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 21:30 IST

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे राहणारी पूजा सुरेश सकट (वय १९ वर्षे) ही युवती २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. २२ एप्रिल रोजी पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला.

ठळक मुद्देअंत्यसंस्काराप्रसंगी मोठा पोलीस फौजफाटा सकट कुटुंबीयांचे एक महिन्यात पुनर्वसन करणार

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे वाडा पुनर्वसन येथे राहणारी पुजा सकट ही युवती बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, २२ एप्रिल रोजी पुजाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात सोमवारी ९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर दोघांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. सकट कुटुंबीयांच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडा पुनर्वसन येथे राहणारी पूजा सुरेश सकट (वय १९ वर्षे) ही युवती २१ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर रात्री उशिरा पूजा बेपत्ता झाल्याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर २२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास पूजाचा मृतदेह वाडा पुनर्वसन येथील एका विहिरीमध्ये आढळून आला. त्यानंतर काही तणाव निर्माण झाला होता. पूजाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर सकट कुटुंबीयांनी पूजाच्या आत्महत्येप्रकरणातील आरोपींना अटक व सकट कुटुंबीयांचे पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पार्थिव स्वीकारणार नसल्याचा पावित्रा घेतला. दरम्यान, पोलीस अधीक्षक सुएझ हक यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी संपर्क साधला असता एक महिन्यात पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन देत फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीतील इसमांवर गुन्हे दाखल करण्याचीही कार्यवाही सुरू केल्याने सोमवारी सकाळी कोरेगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.  दरम्यान, दिलीप नानासाहेब सकट (रा. केडगाव, जि. अहमदनगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुरेश सकट कुटुंबीयांना घर सोडून जाण्याची व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान, २ जानेवारी रोजी संचारबंदी लागू असतानाही त्यांचे घर, कार्यालय जाळून टाकले होते. यावेळी जयदीप सकट व पूजा सकट यांच्या डोळ्यांसमोर हा प्रकार घडला असल्याने त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतरही ११ फेब्रुवारीसही सकट यांना धमकी देण्यात आली होती. दरम्यान, २० एप्रिल रोजी रातंजन, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील यात्रा असल्याने सुरेश सकट व जयदीप सकट हे यात्रेसाठी गावी गेले असताना, दि.२१ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पूजा घरातून गायब झाली. त्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. दरम्यान, दि. २२ रोजी पूजा हिचे पार्थिव रोहिदास उंद्रे यांच्या विहिरीत सापडले. यावरून पूजा हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अ‍ॅड. सुधीर ढमढेरे, विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक, नवनाथ ज्ञानोबा दरेकर, सोमनाथ फक्कड दरेकर, विलास काळुराम दरेकर, सुभाष गणपत घावटे, गोरक्ष पाटीलबुवा थोरात, गणेश गोरक्ष थोरात त्यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ३०६, ३४, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याचे २०१५ चे सुधारित कलम ३ (२) (५) नुसार गुन्हे दाखल केला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाकरे हे करीत आहे, तर विलास श्रीधर वेदपाठक, गणेश विलास वेदपाठक यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे.

टॅग्स :PuneपुणेDeathमृत्यूCrimeगुन्हाPoliceपोलिसSuvez Haqसुवेज हक