शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

राम कदम यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार : सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 22:05 IST

भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात टीका सुरु असताना त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे.

पुणे : भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या दहीहंडी उत्सवात केलेल्या वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात टीका सुरु असताना त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा असा अर्ज पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हा अर्ज दिला आहे. 

     घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कदम यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्यभरातून टीका केली जात आहे. मुलींना पळवून आणण्यास मदत करेल या वक्तव्याचा सर्व स्तरातील महिलांनी समाचार घेतला आहे. याच संदर्भात चाकणकर यांनी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यात कदम यांनी समस्त महिलांचा अपमान केल्याचे म्हटले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या विषयावर चाकणकर म्हणाल्या की, कदम यांचे वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. परिचारक, दानवे, छिंदम अशा भाजपच्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या यादीत कदम अव्वल ठरले आहेत. त्यांच्या या वाक्यामुळे समस्त महाराष्ट्राच्या माता- भगिनींचा अपमान झाला असल्याने या संबंधीचा अर्ज दिला आहे. अविचारीपणे महिलांबद्दल जीभ सैल सोडून बोलणाऱ्या कदम यांनी फक्त माफीनामा नाही तर राजीनामा द्यायला हवा अशी मागणी त्यांनी केली. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRam Kadamराम कदमDahi Handiदही हंडीBJPभाजपा