शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

"सकाळी केली अजितदादांकडे तक्रार, अन् रात्री मिळाला न्याय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 13:49 IST

बारामती पोलिसांच्या मदतीने निवृत्त शिक्षकांना मिळाली हक्काची जमीन

ठळक मुद्देशिक्षक ग्रुपने ४० गुंठे जागा तीन एजंटच्या माध्यमातून विकली होती.

बारामती: एखादे काम होणारे असेल तर ते तातडीने पूर्णत्वाला नेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हातखंडा आहे. याची प्रचिती रविवारी साताऱ्यात फलटण येथील ११ निवृत्त शिक्षकांना आली. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार सुरू होता. यावेळी फलटण तालुक्यातील निवृत्त शिक्षकांनी जमिन फसवणुकीबाबतची तक्रार पवार यांच्या कानी घातली. पवार यांच्या सुचनेनुसार बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रविवारी रात्रीच या शिक्षकांची हक्काची जमिन परत मिळवून दिली.

फलटण तालुक्यातील ११ शिक्षकांनी निवृत्त झाल्यावर सर्व मिळालेली आयुष्यभरची रक्कम खर्च करून बारामती शहरातील खंडोबा नगर येथे ग्रुप मध्ये ६० गुंठे जागा विकत घेतली होती. चांगला भाव विकताना येत असल्याने त्यातील ४० गुंठे जागा शहरातील नामांकित  'तीन एजंट' च्या माध्यमातून विकली. त्या तिघांनी कमिशन तर कमावले. व त्याच बरोबर फलटण ग्रुपचा विश्वास संपादित केला. त्यामुळे फलटण शिक्षक ग्रुप त्या तिघांवर खुश होता.

आता राहिलेल्या वीस गुंठे विकण्याची जवाबदारी सुद्धा त्या तिघांवर टाकली. विश्वास संपादित केलेले तिघांनी २० गुंठे विकली व त्यातील फक्त १४ लाख रुपये दिले व राहिलेले १ कोटी २८ लाख ५० हजार उद्या देऊ. आज कायम खुश खरेदी (दस्त नोंदणी ) करून द्या, असे विश्वासाने सांगितले. पहिला व्यवहार उत्तम झाल्याने फलटण शिक्षक ग्रुप ने  कायम खुश खरेदी करून दिले. परंतु काही तासातच त्या तिघांनी पलटी मारून आता राहिलेली रक्कम देत नसल्याचे सांगून काय करायचे ते करा , बारामती मध्ये आमचे कोण वाकडे करू शकणार नाही. अशी भूमिका घेतली. फलटण शिक्षक ग्रुप ने विनंती करूनही ते रक्कम आणि जमीन परत देण्यास तयार नव्हते. 

अजित पवार यांच्या कानी तक्रार पडताच दिल्या पोलिसांना चौकशीच्या सूचना  

रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनता दरबारात यातील काही शिक्षकांनी व्यथा मांडून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली. पवार यांनी त्वरित येथे उपस्थित असलेले अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना या प्रकरणात दोन्ही बाजू व सत्यता पाहून गुन्हेगार असतील त्यांना सदर रक्कम देऊन टाकण्यास सांगा अशी सूचना केली. तिघांना पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली. परंतु प्रतिसाद देत नसल्याने पोलीस खाक्या दाखवताच फसवणूक केल्याची कबुली त्यांनी दिली.  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीTeacherशिक्षकPoliceपोलिस