शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

विद्यापीठात तक्रार पेट्यांचा फक्त देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 3:16 PM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागांमध्ये बसविण्यात आलेल्या तक्रार पेट्या केवळ देखाव्यापुरत्याच उरल्या असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देएका विद्यार्थिनीने प्राध्यापकाविरोधात लेखी तक्रार कित्येक दिवस ‘बंद पेटी ’ तच

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध विभागांमध्ये बसविण्यात आलेल्या तक्रार पेट्या केवळ देखाव्यापुरत्याच उरल्या असल्याचे चित्र आहे. या पेट्या उघडल्याच जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने प्राध्यापकाविरोधात लेखी तक्रार या पेटीत टाकली होती. मात्र, ही तक्रार पेटीच कित्येक दिवस ‘बंद पेटी ’ तच राहिली . विद्यापीठातील एका विभागातील प्राध्यापकांनी विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थीनीने याबाबत कुलगुरूंकडे तक्रार केली आहे. पण त्यापुर्वी तिने विभागातील तक्रार पेटीमध्ये लेखी तक्रार टाकली होती. पण त्यानंतर कित्येक दिवस ही पेटी उघडलीच गेली नाही. त्यामुळे अखेर तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर या विद्यार्थीनीने थेट कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे संबंधित प्राध्यापकांची तक्रार केली. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर कुलगुरूंनी संबंधित प्राध्यापक व विभागप्रमुखांकडे याबाबत विचारणा केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनी तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या विविध तक्रारींसाठी विद्यापीठात विशाखा समितीही स्थापन केली आहे. मात्र, या समितीकडे तक्रारीच येत नाहीत. त्यातच आता तक्रार पेट्याही उघडल्या जात नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे विद्यापीठाने देशात मानांकनात आघाडी घेतलेली असताना असे प्रकार उघडकीस येत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठeducationशैक्षणिकProfessorप्राध्यापकnitin karmalkarनितीन करमळकर