शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत , पाणी बंद केल्याने शंभर जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:12 IST

पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे.

ठळक मुद्देशासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद

खेड : भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जबरदस्तीने बंद केल्याने शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून भामा आसखेड सिंचन व्यवस्थापनच्या उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे.त्यामुळे तब्बल शंभर जणांवर चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.७) रात्री गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  पुनर्वसन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत धरणातून पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेले प्रकल्पबाधित शेतकरी कायदेशीर अडचणीत सापडले आहे. परंतू, पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न दिसत आहे.भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उप-विभाग करंजविहीरेचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे (वय ५८,रा. मांजरी बुद्रुक ता. हवेली) यांनी या बाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार सत्यवान नवले, बळवंत डांगले, गणेश जाधव, सचिन डांगले, तुकाराम नवले, निवृत्ती नवले, किसन बळवंत डांगले, हिरामण शिवेकर, तुकाराम शिंदे, दत्तू शिंदे, रमेश आवळे, दतात्रेय शिंदे, अनिल देशमुख, मल्हारी शिवेकर,अण्णा देव्हाडे, गणेश नवले , प्रकाश जाधव, लक्ष्मण नवले, नामदेव बांदल या एकोणीस जणांसह अन्य ८० ते १०० जणांवर भा. दं. वि. कलम ३५३, ४५२, १४१, ४३, १४७, १४९, ५०६ मु.पो.का. कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.उपविभागीय अधिकारी मेमाणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की, भामा आसखेड धरणातील पाणी सोडण्यास परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे. मात्र, या धरणातील पाणी सोडण्याच्या संदर्भात पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानंतर गुरुवारी सायंकाळी सहा वाजता धरणातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.६) सकाळी अकराच्या सुमारास या सुमारे ८० ते १०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी संगनमताने करंजविहीरे येथील कार्यालयात जबरदस्तीने येऊन अधिकाऱ्यांना धमक्या व दमबाजी सुरु केली. आमचे पुनर्वसन झालेले नाही. आम्हाला पर्यायी जमिनी मिळालेल्या नाही. अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. ते प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून एक थेंबही पाणी आम्ही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी कार्यालयात जबरदस्तीने घुसून भामा आसखेड धरणाचे शाखा अभियंता भारत बेंद्रे,अभियांत्रिकी सहायक केरू दगडू पांडे, वरिष्ठ लिपिक प्रवीण वाळेकर, तानाजी गौड, बाबाजी गरुड यांना धमक्या देऊन आणि दमबाजी करून बळजबरीने धरणातून सोडलेले पाणी बंद करण्यास भाग पाडले. सर्वांनी संगनमताने शासकीय कर्तव्य पार पडण्यास अडथळा निर्माण केल्याचे अधिकारी मेमाणे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :KhedखेडDamधरणChakanचाकणPoliceपोलिसCrimeगुन्हाFarmerशेतकरी