शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वारंवार निविदा काढूनही पीक विम्यासाठी पुढे येईनात कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 12:29 IST

विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुतांशी कंपन्यांनी पीक विमा उतरविण्याकडे पाठ फिरवली आहे़...

ठळक मुद्देशेतकरी अडचणीत : केवळ तीनच कंपन्यांनी विमा हप्ता दराचा सादर केला तपशीलसद्य:स्थितीला फक्त ३ हजार शेतकऱ्यांनाच विम्याची रक्कम बाकी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये राज्यामधील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम अदा

- नीलेश राऊत - पुणे : नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा देणारा पीक विमा उतरविण्यासाठी राज्यात कृषी विभागाला वारंवार निविदा काढण्याची वेळ आली आहे़. गेल्या काही वर्षांतील वाढलेला विमा परतावा, नियमांची होणारी पायमल्ली व जोखीम याबाबींमुळे अनेक विमा कंपन्यांनी पीक विमा उतरविणे नको रे बाबा, अशीच भूमिका घेतली आहे़. कृषी आयुक्तालयाने रब्बी हंगाम २०१९-२० करिता तीनदा निविदा काढून व त्यांना मुदत वाढ देऊनही आजमितीला केवळ तीनच विमा कंपन्यांनी आपल्या विमा हप्ता दराचा तपशील सादर केला आहे़. तर राज्यातील सोलापूर, लातूर, हिंगोली, वाशिम, भंडारा, बीड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांकरिता एकाही कंपनीने पीक विमा उतरविण्यासाठी निविदा सादर केलेली नसल्याने येथील पीक विमा कसा उतरवणार, हा प्रश्न उभा ठाकला आहे़. पीक विमा विभागात, विमा कंपन्यांना अनेकदा कमी मार्जिनवर काम करावे लागते़. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पीक विम्याचा राज्यातील पे-आऊट हा १४० टक्क्यांपर्यंत राहिला आहे़. परिणामी, विमा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बहुतांशी कंपन्यांनी पीक विमा उतरविण्याकडे पाठ फिरवली आहे़. नैसर्गिक आपत्ती वारंवार येत असल्याने शेती उत्पन्न घटले असून, पिकाच्या शाश्वतीबाबतही साशंकता निर्माण होत आहे़. परिणामी, हा विमा उतरविताना जोखीम वाढली गेल्याने, विमा कंपन्यांनी समूहनिहाय (क्लस्टरवाइज) भारांकित विमा हप्ता दर वाढविला आहे़.प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) रब्बी हंगाम २०१९-२० करिता राज्याचे ६ जिल्हासमूह करून सदर योजना राबविण्यासाठी, केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या विमा कंपन्यांकडून ९ सप्टेंबर रोजी ई-निविदा मागविण्यात आल्या़. यामध्ये केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या १८ विमा कंपन्यांपैकी केवळ तीन कंपन्यांनी ई-निविदा सादर केल्या़; परंतु सर्व ६ जिल्हा समूहांमध्ये ३ पेक्षा कमी विमा कंपन्यांचा सहभाग असल्याने ३ ऑक्टोबर रोजी फेर ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली. परंतु, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने यास २३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली़. या मुदतीत फ्यूचर जनरल इन्शुरन्स कंपनी, भारती अ‍ॅक्सा इन्शुरन्स कंपनी, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी निविदा सादर केल्या आहेत़. तर, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने ई-निविदा सादर करताना त्यांना निविदेच्या अटी व शर्ती मान्य नसल्याचेच नमूद केल्याने सदर विमा कंपनीची निविदा अपात्र ठरविण्यात आली आहे़. .....

सद्य:स्थितीला फक्त ३ हजार शेतकऱ्यांनाच विम्याची रक्कम च्ई-निविदा सादर होत असल्याने ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ दिल्याने, राज्यातील सहा जिल्हा समूहांमध्ये अहमदनगर, यवतमाळ, बुलढाणा, सातारा, नांदेड या जिल्हा समूहांकरिता रिलायन्स इन्शुरन्स कंपनी व दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत़. यामध्ये सहभागी झालेल्या या दोन कंपन्यांमधील रिलायन्स कंपनीने यापूर्वीच्या तीन जिल्हा समूहामध्ये अटी व शर्ती मान्य नसल्याचे सांगितले आहे़.....प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१९-२० मध्ये राज्यामधील बहुतांशी शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम अदा करण्यात आली आहे़. सद्य:स्थितीला अंदाजे ३ हजार शेतकऱ्यांनाच पीक विम्याची रक्कम अदा करण्याची बाकी असून, ही बाकी तांत्रिक अडचणींमुळे रखडली आहे़. यामध्ये अनेक विमा दाव्यांमध्ये खाते क्रमांक चुकीचा असल्याने ५ कोटी रुपयांची ही बाकी अदा करता आलेली नाही. परंतु, बँकांकडून ही पडताळणी सध्या सुरू असून, लवकरच शेतकऱ्यांना ही विमा रक्कम अदा केली जाईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयातून दिली गेली़. राज्यातून खरीप हंगामाकरिता एकूण १ कोटी २७ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यापैकी केवळ २ ते ३ हजार शेतकऱ्यां ना तांत्रिक अडचणींमुळे ही पाच कोटी रुपयांची विमा रक्कम मिळालेली नाही़. ........

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाGovernmentसरकार