सामुदायिक रेडिओ प्रभावी माध्यम
By Admin | Updated: February 16, 2016 01:13 IST2016-02-16T01:13:25+5:302016-02-16T01:13:25+5:30
सामुदायिक रेडिओ हे प्रभावी जनसंवादाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन समुदाय रेडिओच्या विभागीय संमेलनामध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.

सामुदायिक रेडिओ प्रभावी माध्यम
पिंपरी : सामुदायिक रेडिओ हे प्रभावी जनसंवादाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन समुदाय रेडिओच्या विभागीय संमेलनामध्ये पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने चौथे विभागीय रेडिओ संमेलन सोमवारी दि. १५ला येथील एका हॉटेलमध्ये घेण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
रेडिओ संमेलनास दहा राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दोन दिवसीय संमेलनात विविध मान्यवरांचे चर्चासत्र घेण्यात येणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी विविध रेडिओंचे अनुभवकथनही झाले. यामध्ये नवनव्या संकल्पानांचा विचार कसा केला जाईल, यावर चर्चा झाली.
या वेळी सामुदायिक रेडिओचे माध्यम तज्ज्ञ डॉ. आर. श्रीधर, कम्युनिटी रेडिओ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल गोजे, एफटीआयचे संचालक एस. जे. चांदेकर आदी उपस्थित होते.
प्रथम सत्रात पहिल्या दिवशी विश्राम ढोले यांचे ‘रेडिओ फॉर सोशल डेव्हलपमेंट’, ‘कम्युनिटी रेडिओ फॉर एज्युकेशन’, ‘कम्युनिटी रेडिओ फॉर लायव्हलीहूड’, ‘सीआर फॉर अॅक्सेस टू जस्टिस’, ‘कम्युनिटी रेडिओ फॉर डीसेंट्रलाइज्ड’, ‘प्लॅनिंग अँड इनक्लुजन’ ही चर्चासत्रे झाली.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पॅनल ग्रुपचे प्रेझेंटेशन आणि आर. श्रीधर यांचे ‘इसेन्शिअल आॅफ स्टेशन मॅनेजमेंट अँड रेकॉर्ड कीपिंग’ या विषयावरील चर्चासत्र झाले. त्यानंतर अनिल कुमार आणि सचिन
आंचन यांचे ‘एअर पेपर आॅन व्हॅल्यू अॅडिशन’, वसुंधरा वाहिनीचे शुभम घाटगे यांचे ‘डिजिटल आॅडिओ प्रॉडक्शन’ या विषयावर चर्चासत्र झाले.
आनंद देशमुख, ब्रह्मप्रकाश अन्सारी, सलीला अन्सारी, अमित द्विवेदी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. पंकज आठवले यांनी सूत्रसंचालन केले. संजय चांदेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)