शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मादीच्या शोधात संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; तळेगाव ढमढेरेत घातला होता धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 18:05 IST

बिबट्याने धावत्या दुचाकीवरील लोकांवर हल्ला करण्याबरोबरच अनेकांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे फस्त केली

तळेगाव ढमढेरे :  तळेगाव ढमढेरे परिसरात अनेक दिवसांपासून लोकवस्तीत दहशत माजवणाऱ्या बिबट्यास अखेर पकडण्यास यश आले आहे. पिंजऱ्याची जागा बदलताच बारा तासाच्या आत बिबट्या जेरबंद झाला आहे. अनेक दिवसांपासून हा बिबट्या तळेगाव ढमढेरे टाकळी भिमा रस्त्या नजीकच्या ढमढेरे वस्ती परिसरात वास्तव्यास होता. त्यामुळे नागरिकही दहशतीखाली होते. मात्र आता त्याला पकडण्यात यश आले आहे. आज पहाटे बिबट्या या पिंजऱ्यात अडकला आहे. बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. तळेगाव ढमढेरे परिसरातील  चौधरी वस्ती, ढमढेरे वस्ती, भिमाशेत, मोहन मळा, साळूमाळी वस्ती परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार संचार नागरिकांना पाहायला मिळत होता. बिबट्याने धावत्या दुचाकीवरील लोकांवर हल्ला, अनेकांच्या शेळ्या मेंढ्या वासरे फस्त केलेली होती. तर त्या परिसरात कुत्री गायब झालेली होती. तळेगाव ढमढेरे परिसरातील  ढमढेरे वस्तीनजीक वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी २९ एप्रिल रोजी पिंजरा लावला होता. मात्र वीस दिवस उलटूनही बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. त्यामुळे नागरिकांच्या आग्रहास्तव वस्तीपासून थोडा दूर पिंजरा दुसऱ्या जागी (दि.२० मे) लावल्यानंतर त्या पहिल्याच रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. बिबट्याची मादी आणि पिल्ले याच परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.       शिरूरचे वनधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रमोद पाटील,वनरेस्क्यू टीम सदस्य गणेश टिळेकर,वनकर्मचारी  बाबासो घोलप यांनी कार्यवाही केली तर अमोल ढमढेरे,संतोष ढमढेरे,वैभव ढमढेरे,रामभाऊ ढमढेरे,भाऊ सोनवणे,सार्थक ढमढेरे,सार्थक ढमढेरे,योगेश सोनवणे आदी युवकांनी पिंजरा लावण्यापासून ते स्थलांतर करेपर्यंत अथक प्रयत्न केले.

 याबाबत  माहिती देताना वनरक्षक प्रमोद पाटील म्हणाले की, धानोरे,विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे या गावातील वाड्या वस्त्यांवर हाच नर जातीचा बिबट्या आठ ते दहा किलोमीटर पर्यंत भक्ष मिळवण्याच्या शोधत फिरत होता. नर जातीचा बिबट्या असून साधारण बारा ते चौदा वयोगटातील आहे. मादी व पिल्ले याच परिसरात असल्याने त्याचा संचार होत होता असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरleopardबिबट्याforest departmentवनविभागenvironmentपर्यावरण