शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तसाहेब, पुण्यात हे काय चाललंय? ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाही; कुठे तोडफोड तर कुठे लूटमार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:11 IST

गावगुंडांच्या निशाण्यवर सर्वसामान्य नागरिक असून त्यांना धडा शिकवावा आणि सर्वसामान्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, यासाठी उपाययोजना कराव्यात अशी भावना पुणेकरांची आहे.

पुणे : सुसंस्कृत पुणे शहरात ‘कोयता गँग’ची दहशत थांबायचं नाव घेतच नाहीये. कुठे रस्त्यावर उभी वाहनं फोडली जात आहेत. तर कुठे लूटमार केली जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील विमाननगर परिसरात घडला आहे. 

२६ तारखेला विमाननगरमध्ये कोयता गँगच्या पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं एका पान टपरीवाल्यावर हल्ला करत धुमाकूळ घातला. या टोळक्याला सुरुवातीला सिगारेट दे, विमल दे असं म्हणत दुकानात असणाऱ्या व्यक्तीला धमकावलं. या गुंडांचा उन्नत पाहून दुकानदार त्यांना पाहिजे त्या वस्तू देतही होता. सिगारेट, विमल आणि पाहिजे ते घेतल्यानंतरही या गुंडांचं समाधान झालं नाही. त्यानंतर टोळक्यातील एकाने शर्टात लपवलेला कोयता बाहेर काढला. आणि क्षणात दुकान फोडायला सुरुवात केली. दिसेल त्या वस्तूंवर शटर, काउंटर, दुकानातील वस्तू यावर त्याने कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. या टोळक्याचा हा उन्माद पाहून परिसरात उपस्थित नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. आणि त्यानंतर हे गावगुंड पळून गेले. संबंधित दुकानदार यातून सावरत असतानाच हातात कोयता घेतलेला तो गुंड पुन्हा आला. पुन्हा कोयत्याचा धाक दाखवला. आणि पुन्हा त्याला पाहिजे त्या वस्तू घेऊन निघून गेला. हे सर्व वर्दळीच्या घडत होतं  सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोयता गॅंगच्या दहशतीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

दुसऱ्या एका घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. फुरसुंगीतील आदर्श नगरमधील टिपू सुलतान चौकात आणखी एका कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. हातात कोयते, दगड घेऊन या गावगुंडांच्या टोळक्याने 20 ते 25 वाहनांची तोडफोड केली. एक-दोन नाही तर वीस ते पंचवीस वाहनं याठिकाणी फोडली आहेत. समोर दिसेल त्या कार, रिक्षा,दुचाकी सगळ्यावर हल्ला केला. गावगुंडांच्या दहशतीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरातही कैद झाला आहे. हातात कोयते असल्यानं कुणीही या गावगुंडांना थांबवण्याची हिंमत केली नाही. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड झाल्याने पुणे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. 

कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागल्याने पोलिसांनी फुरसुंगीतील आरोपींचा शोध घेतला. तर यातील बहुतांश आरोपी अल्पवयीन निघाले. यातील सज्ञान आरोपी फऱ्या उर्फ फरहान साहेबलाल शेख याला अटक केली. इतकच नाही तर ज्या ठिकाणी या गुंडांनी तोडफोड केली होती. त्याच ठिकाणी यांना नागरिकांच्या समोर फटकावलं. आणि पुन्हा असं करणार नाही हे बघून घेतलं. मात्र गुन्हा घडल्यानंतरच पोलीस जागे होणार आणि गावगुंडांना धडा शिकवणार  हा प्रकार आणखी किती दिवस चालणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील काही महिन्यात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंडांच्या टोळ्यांना धडा शिकवला. आंदेकर गॅंग, मारणे गॅंग, घायवळ गॅंग, टिपू पठाण या गॅंगच्या गुंडांवर मोका कायद्यानुसार कारवाई केली. या टोळ्यातील बहुतांश गुंड आता वेगवेगळ्या तुरुंगात आहेत. त्यामुळे गुंडांच्या टोळ्यांची भीती कमी झाली असं वाटत असतानाच हातात कोयता घेतलेले हे गावगुंड दहशत पसरवू लागले आहेत. आणि त्यांच्या निशाण्यवर सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्तांनी नामचीन गुंडांना जसा धडा शिकवला तसाच धडा या गावगुंडांनाही शिकवावा आणि  सर्वसामान्य नागरिकांनाही सुरक्षित वाटलं पाहिजे. यासाठी उपाययोजना कराव्यात अशी भावना सर्वसामान्य पुणेकरांची आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune gripped by 'Koyta Gang' terror; citizens demand police action.

Web Summary : Pune faces 'Koyta Gang' terror, with vandalism and robberies. Recent incidents in Viman Nagar and Phursungi reveal brazen attacks on shops and vehicles, captured on CCTV. Police arrested some perpetrators, many minors, sparking public concern over law and order and demands for stricter action.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकcommissionerआयुक्तCourtन्यायालय