शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त जाधव झाले सजग

By admin | Updated: February 24, 2015 01:24 IST

अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने दोन वेळा कडक ताशेरे

पिंपरी : अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत महापालिकेकडून दिरंगाई होत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने दोन वेळा कडक ताशेरे ओढल्यानंतरही महापालिकेकडून गंभीर दखल घेतली जात नव्हती. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी व विद्यमान आयुक्त राजीव जाधव यांच्या कार्यपद्धतीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणारे विशेष वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर आयुक्त जाधव यांनी गंभीर दखल घेतली असून, तातडीने अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. अनधिकृत बांधकाम कारवाईबाबत गाफीलपणा दाखविणे प्रशासनाच्या दृष्टीने संकट ओढविणारे ठरू शकते. त्यामुळे अनधिकृत बांधकामाविरुद्धची कारवाई सुरू ठेवा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांच्या सुनावणीत आदेश देऊनही महापालिका प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही, ही बाब याचिकाकर्त्यांनी वेळोवेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईत पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे, तर कधी मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करून महापालिकेने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी स्वतंत्र पदनिर्मिती करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या. त्यानुसार महापालिकेने १३५ पदांना शासनाची मंजुरी मिळवून भरतीप्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच दर तीन महिन्यांनी महापालिकेने कारवाईचा अहवाल सादर करावा,असे आदेश दिले आहेत. न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यानंतरही महापालिकेची कारवाईतील संथगती पुढील काळात संकट ओढविणारी ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन आयुक्त जाधव यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. कामात हलगर्जीपणा दाखविणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दांत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत. आयुक्त परदेशी यांच्या कार्यपद्धतीशी तुलना होऊ लागल्याने सर्वांची जबाबदारी वाढली असून, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने काम करावे, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)