शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांची दूरशिक्षणला अधिक पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 13:07 IST

दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले असून आत्तापर्यंत सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत

ठळक मुद्देसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधीविद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांत दूरस्थ अभ्यासक्रमासाठी दिले केंद्र

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रम बंद करून मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत दूरस्थ अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना येत्या ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. मात्र, पुण्यातील नामांकित महाविद्यालयांमधील दूरशिक्षण केंद्रातील वाणिज्य शाखेच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व जागा भरल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांकडून वाढीव जागांची मागणी केली जात आहे.विद्यापीठाने दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू केले असून आत्तापर्यंत सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. विद्यार्थ्यांना मुक्त अध्ययन प्रशालेअंतर्गत बी.ए., बी.कॉम., एम.कॉम., एम.ए. अभ्यासक्रमास प्रवेश दिले जात आहेत. त्याचप्रमाणे एमबीए अभ्यासक्रमासही प्रवेश दिले जात आहे. विद्यापीठाने या प्रवेश प्रक्रियेसाठी अहमदनगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील सुमारे ५० केंद्रांना मान्यता दिली आहे. महाविद्यालयात सुरू केलेल्या केंद्रांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज जमा करायचा आहे. त्यानुसार विद्यार्थी त्यांनी निवडलेल्या नजीकच्या केंद्रात अर्ज व कागदपत्र जमा करत आहे. सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी दूरस्थ अभ्यासक्रमासाठी अर्ज केला आहे.विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांत दूरस्थ अभ्यासक्रमासाठी केंद्र दिले असले तरी पुणे शहरातील काही नामांकित महाविद्यालयांतील केंद्रांमधील सर्व जागा भरल्या आहेत. विद्यापीठाने प्रत्येक केंद्राला ५० विद्यार्थी दिले आहेत. त्यात कला शाखेपेक्षा वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांकडून विचारणा होत असल्याने काही महाविद्यालयांनी दूरस्थ अभ्यासक्रमाच्या जागा वाढवून मिळाव्यात, असे पत्र विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेला पाठविले आहे. परंतु, विद्यापीठाने अद्याप याबाबत निर्णय घेतलेला नाही.मुक्त अध्ययन प्रशालेच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. संजय चाकणे म्हणाले, दूरस्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुमारे ८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यातही पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील केंद्रांना दिलेल्या सर्व जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. बी.ए., बी.कॉम. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या उल्लेखनीय आहे...........दोन्ही अभ्यासक्रम वेगळे असावेतमुक्त अध्ययन केंद्राच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि पुणे विद्यापीठाचा नियमित अभ्यासक्रम एकसारखा असेल तर नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊ शकते. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रम वेगळे असावेत, असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ