दिलासादायक! पुण्यात कोरोना चाचण्या वाढल्या पण बाधितांची टक्केवारी सातच्या आतच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:37 AM2021-01-04T11:37:25+5:302021-01-04T11:37:59+5:30

रविवारी शहरात ४ हजार ८२ जणांनी कोरोना चाचणी केली, यापैकी केवळ २९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

Comfortable! Corona tests increased in Pune but the percentage of victims remained within seven per cent | दिलासादायक! पुण्यात कोरोना चाचण्या वाढल्या पण बाधितांची टक्केवारी सातच्या आतच

दिलासादायक! पुण्यात कोरोना चाचण्या वाढल्या पण बाधितांची टक्केवारी सातच्या आतच

Next
ठळक मुद्देसक्रिय रूग्णसंख्याही तीन हजाराच्या आत

पुणे : शहरातील माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन कोरोना चाचणीचे प्रमाण गेल्या तीन-चार दिवसांपासून हजार ते दीड हजाराने वाढले असले तरी, करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्या (तपासणी) च्या तुलनेत कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण मात्र ७ टक्क्यांच्या आतच असल्याचे समाधानकारक चित्र शहरात आहे.

रविवारी शहरात ४ हजार ८२ जणांनी कोरोना चाचणी केली, यापैकी केवळ २९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ मात्र यातील बहुतांशी जण हे लक्षणेविरहित आहेत. दरम्यान शहरातील सक्रिय रूग्ण (अ‍ॅक्टिव्ह) ही गेल्या आठ महिन्यात प्रथमच तीन हजाराच्या आत आली असून, आजमितीला शहरात केवळ २ हजार ९०९ सक्रिय रूग्ण आहेत.यापैकी सुमारे ७० टक्के रूग्ण हे होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) मध्येच आहेत.तसेच हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्णांपैकी बहुतांशी रूग्ण हे उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे यांनी लोकमतला दिली. 

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरात ४२० जण कोरोनामुक्त झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. तर शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २५० गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १५५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये आॅक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या आजमितीला ६४२ इतकी आहे.  आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६४७ इतकी झाली आहे.

शहरात आजपर्यंत ९ लाख २९ हजार २६१ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७९ हजार ५९८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.  यापैकी १ लाख ७२ हजार ४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

==========================

Web Title: Comfortable! Corona tests increased in Pune but the percentage of victims remained within seven per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.