शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक! पुण्यात शुक्रवारी एकाच दिवसात ५१ रुग्ण बरे होऊन गेले घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 18:35 IST

कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे आश्वासक चित्र निर्माण

ठळक मुद्देआतापर्यंतचा सर्वाधिक आकडा : गुरुवारीही ४४ जणांना सोडले होते घरी

पुणे : एकीकडे कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे दिलासादायक आणि सकारात्मक घटना घडते आहे. कोरोनामधून ठणठणीत बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. सलग दोन दिवस हा आकडा ४५ च्या वर राहिला असून दोन दिवसात तब्बल ९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ३२५ रुग्ण बरे झाले असून एकूण ९२ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण मृत्यूंपेक्षा अधिक असल्याचे आश्वासक चित्र निर्माण होऊ लागले आहे.कोरोनाचा शहरातील प्रादुर्भाव वाढत असल्याचे गेल्या आठवड्याभरातील आकडेवारीवरुन दिसत आहे. गेल्या आठवड्यात साडेपाचशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  सुरुवातीच्या काळात महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयामध्ये उपचारांची सुविधा होती. परंतू, पालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिका-यांच्या प्रयत्नातून अन्य खासगी रुग्णालयांमध्येही उपचारांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासोबतच ससून रुग्णालयातही रुग्णांवर उपचार केले जात आहेत.गेल्या काही दिवसात बरे होऊन घरी जाणा-यांची संख्या दिवसाला तीन-चार अशी होती. परंतू मागील आठवड्यात हा आकडा वाढून दहा ते बारावर आला होता. बुधवारी एकाच दिवसात २७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यानंतर गुरुवारी हा आकडा वाढून ४४ वर गेला. गुरुवारी त्यामध्ये आणखी वाढ होत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ५१ वर गेला. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा वाढू लागल्याने दिलासा मिळाला आहे. महापालिका कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता विविध पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत आहे. वैद्यकीय उपचारांसोबतच लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.======महापालिका लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासोबतच वैद्यकीय उपचार, स्वच्छता, जनजागृती, सुरक्षा साधने पुरविणे आदी पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र आजारातून पुर्णपणे बरे झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे. या चार दिवसात बरे झालेल्यांची संख्या १३३ झाली असून ही सकारात्मक बाब आहे. यामुळे नागरिकांचा उपचारांवरील विश्वास नक्कीच वाढेल. आतापर्यंत १६११ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेले असले तरी प्रत्यक्षात अ?ॅक्टिव्ह केसेस ११५० आहेत.- रुबल अगरवाल, अतिरीक्त आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल