शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी यावं शहाणपण! पुण्यात एक नाही तर अनेक 'फॅशन स्ट्रीट' आहेत दुर्घटनांच्या उंबरठ्यावर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 18:34 IST

फॅशन स्ट्रीटसारखेच मार्केट पुण्यातल्या अनेक भागांमध्ये उभे राहिले आहेत.

प्राची कुलकर्णी - पुणे : फॅशन स्ट्रीटसारखेच मार्केट पुण्यातल्या अनेक भागांमध्ये उभे राहिले आहेत. पण बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभाग यांच्यापैकी कारवाई करायची तरी नेमकी कोणी या वादात इथली अतिक्रमणं मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत. 

पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावर फॅशन स्ट्रीटसारखेच तीन मार्केट उभे राहिले आहेत. इथली दुकानं इतकी दाटीवाटीने लावली आहेत की नुसतं उभ राहिलं तरी गुदमरायला व्हावं. हे मार्केट उभे राहिले ते गेल्या काही वर्षातच. आधी मुख्य रस्त्यावर टपऱ्या आल्या. आणि पाठोपाठ हा रस्ता शॉपिंग डेस्टिनेशन झाला. हे होता होताच उभी राहिली ती ही शॉपिंग मार्केट. केसरिया लेन, शिरोळे मार्केट आणि हॉंगकाँग लेन या तिन्ही ठिकाणी आता जवळपास प्रत्येकी ५० च्यावर दुकाने आहेत. आजूबाजूला जागा करत हे मार्केट दिवसागणिक वाढत आहे.  

थाटलेल्या दुकानांचा असा भूलभुलैया तयार झाला आहे की एखादी दुर्घटना झाली तर त्यातून वाचणं देखील कठीण आहे. 'फॅशन स्ट्रीट' येथील आगीच्या दुर्घटनेनंतर इथल्या दुकानदारांच्या मनात देखील ही भीती स्पष्ट दिसतेय.

पण याबाबत विचारल्यावर ते म्हणतात "अशी कोणती घटना होऊ नये म्हणून आम्ही दररोज पूर्ण तयारी करतो. इथे दुकानांमध्ये फायर एक्स्टिंग्विशर ठेवले आहेत. तसेच आम्ही रात्री जाताना पण दुकानासमोर पाणी मारून जातो." 

ही तीन मार्केट तर ऐन शहरातली प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण तुळशीबागेपासून ते इतर अनेक ठिकाणी अशा मार्केट चा रूपाने अतिक्रमणाचा विळखा पडलेला पाहायला मिळतो आहे. पण यावर कारवाई करण्यासाठी मात्र महापालिकेचे दोन विभाग एकमेकांकडे बोट दाखवतात.  अतिक्रमण विभागाचा मते ही जबाबदारी बांधकाम विभागाची आहे. तर बांधकाम विभागाचा मते अतिक्रमण कारवाई होणे आवश्यक आहे. या वादात या मार्केट मध्ये दुकानांची संख्या मात्र वाढतेय. आता फॅशन स्ट्रीट दुर्घटनेनंतर तरी या अतिक्रमणावर काही कारवाई होते का ते पाहावे लागेल.

टॅग्स :PuneपुणेfireआगFire Brigadeअग्निशमन दलfashionफॅशन