शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

चलो पुणे...! जेजुरीहून २०० हुन अधिक ग्रामस्थ पुण्याकडे रवाना; विश्वस्तनिवडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:13 IST

ग्रामस्थांच्या या आंदोलनांचा पाचवा दिवस असून राजकीय पक्ष संघटना तसेच सत्ताधारी व विरोधी राजकीय नेत्यांचाही पाठींबा

जेजुरी : जेजुरीच्या मार्तंड देव संस्थान विश्वस्त निवडी च्या विरोधात जेजुरीकरांचे आंदोलन वेगवेगळ्या पातळीवरून पुढे नेण्याचा आंदोलकांचा प्रयत्न असून आज आंदोलक व ग्रामस्थांनी सकाळी या निवडी विरोधात घंटानाद करून निषेध केला. कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार  असून आंदोलन आणखीन जोर धरू लागले आहे. 

दरम्यान, ग्रामस्थांच्या या आंदोलनांचा पाचवा दिवस असून  राजकीय पक्ष संघटना तसेच सत्ताधारी व विरोधी राजकीय नेत्यांचा ही पाठींबा मिळू लागला आहे. आज सकाळी येथील उघडा मारुती मित्र मंडळाच्या वतीने अध्यक्ष सचिन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद करीत तसेच नवीन विश्वस्त निवडीचा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. 

धर्मादाय आयुक्त कार्यालयाने ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करावा. येथील रूढी परंपरांची माहिती असणाऱ्या स्थानिकांना संधी द्यायला हवी होती. मात्र राजकीय दबावाला बळी पडून त्यांनी बाहेरच्या लोकांना संधी दिली. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. त्यांच्या वर्षातील आठ यात्रा, वेगवेगळे धार्मिक विधी, मानपान, रूढी परंपरा जपण्यासाठी विश्वस्त स्थानिकच असायला हवेत असे मंडळाचे अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी सांगितले. 

दरम्यान, आज  पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांची दुपारी चार वाजता भेटण्याची वेळ घेऊन त्यांना ग्रामस्थांचे निवेदन देण्यासाठी सुमारे ५० वाहनांतून दोनशे कार्यकर्ते पुण्याला रवाना झाले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतानाच पुण्याचे धर्मादाय आयुक्तांना ही ग्रामस्थ भेटून या निवडीचा पुनर्विचार करावा म्हनून निवेदन देणार आहेत. ग्रामस्थांच्या विनंतीचा शासकीय पातळीवरून योग्य ती दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढवण्याचा ग्रामस्थांनी यावेळी निर्धार व्यक्त केला आहे

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीTempleमंदिरcollectorजिल्हाधिकारीSocialसामाजिक