शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

निवडणुकीच्या प्रचारात भरला जातोय धर्मपंथाचा रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 12:03 IST

राजस्थानी, कन्नड, बांगला भाषिकांबरोबरच पारशी, मुस्लिम, ओबीसी अशा विविध समाज घटकांचे स्वतंत्र मेळावे भरवून मतदान करण्याचे आवाहन कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले जात आहे..

ठळक मुद्दे धार्मिक भेटीगाठी : कॉंग्रेस-भाजपाचा सामाजिक प्रचार

पुणे : निवडणुक काळामध्ये प्रत्येक पक्ष आपण निधर्मी असल्याचा दावा करीत असला तरी, प्रत्यक्ष प्राचारात मात्र विविध समाजघटक डोळ्यांसमोर ठेऊन सुरु असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. देशभरातून विविध धर्मीय आणि भाषा बोलणाऱ्या व्यक्ती शहरात वास्तव्यास असल्याने राजस्थानी, कन्नड, बांगला भाषिकांबरोबरच पारशी, मुस्लिम, ओबीसी अशा विविध समाज घटकांचे स्वतंत्र मेळावे भरवून मतदान करण्याचे आवाहन कॉंग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने केले जात आहे. याशिवाय कामगार आणि विविध संघटनांचे मेळावे देखील आयोजित केले जात आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंच, राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची फळी यामाध्यमातून भारतीय जनता पार्टीचा विविध घटकांच्या लहानसहान सभा, मेळावे घेण्याकडे कल आहे. आझम कॅम्पस येथे शाहनवाझ हुसेन यांच्या उपस्थितीत नुकताच मेळावा घेण्यात आला. मुस्लिम राष्ट्रीय मंचचे पुणे संयोजक अली दारुवाला यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. येत्या सोमवारी (दि. १५) शहरातील निवडक पारशी समाजातील व्यक्तींशी भाजपाचे उमेदवार गिरीष बापट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे संवाद साधणार आहेत. लष्कर भागातील न्यू क्लब येथे सायंकाळी ७ वाजता हा मेळावा होईल. या मेळाव्यास पारशी समाजातील रयान माजदा, खुशरु बरुचा, बर्जेन इराणी, रुषाद बरुचा, रुस्तमजी जिजीभॉय अशा मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मेमण खोजा ईस्माइली समाजातील व्यक्तींशी देखील बापट संवाद साधतील. कॉंग्रेस पक्ष देखील यात मागे नाही. कॉंग्रेसने नुकताच बिबवेवाडी येथे राजस्थान येथील समस्त जालोर सिरोही प्रवासी बंधुंचा मेळावा घेतला. या बैठकीत राजस्थानचे वनमंत्री सुखराम बिष्णोई, जालोर सुरोही मतदार संघाचे कॉंग्रेसचे उमेदवार रतन देवासी देखील उपस्थित होते. लोकशाहीवादी संघटनांची देखील बैठक बोलावण्यात आली होती. त्यात लोकायत, कम्युनिस्ट पक्ष, फुले शहू आंबेडकर विचार मंच, राष्ट्रसेवा दल, भीम आर्मी, संभाजी ब्रिगेड, शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुस्लिम, कन्नड, ओबीसी, दलित, जैन, ख्रिश्चन अशा विविध संघटनांच्या व्यक्तींशी देखील संवाद साधला जाणार असल्याचे कॉंग्रेसच्या प्रतिनिधींनी सांगितले. कॉंग्रेसने कामगार मेळावा घेत, मतदानाचे आवाहन केले आहे. पक्ष कोणताही विचारधारा असणारा असला तरी, प्रत्यक्ष राजकारण करताना विविध समाजघटकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करीत त्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. संख्येने अल्प, अत्यल्प असले तरी सर्वच समाज घटक आपल्या सोबत रहावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी त्या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींना पाचारण केले जात आहे. अगदी परराज्यातील नेत्यांनाही संवाद साधण्यासाठी बोलावण्यात येत आहे. 

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा