शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालय आवारातील तंबाखूबंदी ‘पुडीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 06:54 IST

‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्डच्या परिसरातच तंबाखू, सिगारेटची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे.

राहुल कलालल्ल पुणेतरुण पिढी व्यसनांना बळी पडू नये म्हणून केंद्र सरकारने शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये आणि त्यांच्या परिसराच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनास व विक्री करण्यास बंदी घातली आहे. या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम शैक्षणिक संस्थांचे असतानाही ते केले जात नसल्याचे चित्र शहरात आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांपासून १०० यार्डच्या परिसरातच तंबाखू, सिगारेटची विक्री केली जात असल्याचे दिसून आले आहे.तंबाखू, सिगारेट, गुटखा या व्यसनांची सर्वाधिक लागण ही तरुणांना होत असल्याचे दिसून आल्याने त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने २००३ मध्ये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा देशात लागू केला. या कायद्यानुसार देशातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये यांमध्ये तंबाखू, सिगारेट यांसह तंबाखूजन्य पदार्थ सेवनास आणि संस्थांच्या १०० यार्ड परिसरांमध्येही तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही अंमलबजावणी करण्यातच येत नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तर यासंदर्भातील फलकही नसल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या अनेक शाळांमध्ये असे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे, पालिकेच्या अनेक शाळांच्या आजूबाजूच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात आहे.