College will get login-id, password | महाविद्यालयात मिळणार लॉगइन-आयडी, पासवर्ड

महाविद्यालयात मिळणार लॉगइन-आयडी, पासवर्ड

विद्यापीठाच्या प्रथम सत्रच्या परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांनी लॉगइन आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी मोबाइल क्रमांक ईमेल आयडी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. परंतु, विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या मॉक टेस्ट दरम्यान काही विद्यार्थ्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड मिळत नसल्याचे दिसून आले.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे परीक्षेसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त केले आहे. त्याचबरोबर विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे लॉगइन आयडी व पासवर्ड पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. थेट विद्यापीठाशी संपर्क साधण्याऐवजी विद्यार्थी महाविद्यालयांमधील आपल्या परिचित प्राध्यापकांशी संपर्क साधून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घेऊ शकतात. त्यामुळे विद्यापीठाने घेतलेला हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.

परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी विद्यापीठाने आवश्यक यंत्रणा उभी केली आहे. परंतु, वर्षभर अभ्यास केल्यानंतर केवळ लॉगइन-आयडी व पासवर्ड माहीत नसल्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणे योग्य नाही. तसेच सर्व महाविद्यालयाकडून आपल्या विद्यार्थ्याला परीक्षा देण्यासाठी अडचण येऊ नये, याबाबत काळजी घेतली जाते. त्यामुळे महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचे लॉगइन आयडी व पासवर्ड देण्यात आले आहेत, असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय चाकणे यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: College will get login-id, password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.