शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन व्यासपीठाकडे महाविद्यालयांची पाठ ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 13:58 IST

विद्यापीठाशी संलग्न सुमारे १ हजाराहून अधिक महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांपैकी केवळ १४ महाविद्यालयांकडूनच ऑनलाईन व्यासपीठाचा वापर

ठळक मुद्देकेवळ 14 महाविद्यालयांकडून वापर; संलग्न महाविद्यालयांची संख्या एक हजाराहून अधिक 

राहुल शिंदे 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाने सुमारे २ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत ऑनलाइनशिक्षणासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार केल्याची घोषणा केली. मात्र, विद्यापीठाशी संलग्न सुमारे १ हजाराहून अधिक महाविद्यालय व शैक्षणिक संस्थांपैकी केवळ १४ महाविद्यालयांकडूनच या ऑनलाईन व्यासपीठाचा वापर केला जात आहे. त्यामुळे इतर संलग्न महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या या व्यासपीठाकडे पाठ फिरवली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.         पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांना कोरोनाच्या काळात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यापीठाने स्वतंत्र व्यासपीठ तयार केले. कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये दुर्गम भागात सुध्दा विद्यार्थ्यांना ऑनलाइन व डाऊन केलेले व्हिडिओ नंतर ऑफलाइन पद्धतीने पाहता येतील या दृष्टीने या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली. प्रथमतः ग्रामीण व शहरी भागातील 14 संलग्न महाविद्यालयांमध्ये या व्यासपीठाच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानंतर एकाही नवीन महाविद्यालयाला या व्यासपीठाचा वापर करणे शक्य झाले नाही.        विद्यापीठाच्या या ऑनलाईन व्यासपीठाचा वापर करण्यासाठी पुणे ,अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यातील आणखी १५ महाविद्यालायांनी विद्यापीठाकडे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे विद्यापीठाशी संलग्न १ हजार महाविद्यालयांपैकी सप्टेंबर महिना अखेरपर्यंत केवळ ३० महाविद्यालयांनाच या व्यासपीठाचा वापर करता येईल.त्यामुळे विद्यापीठाने तयार केलेली ऑनलाइन शिक्षणाची सुविधा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलीच नाही तर निर्मिती करून त्याचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये विद्यापीठाने तयार केलेल्या या ऑनलाईन व्यासपीठाबाबत चर्चा करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाबाबत येणाऱ्या अडचणींसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

विद्यापीठाचे सर्व अधिकारी सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीच्या नियोजनात अडकून पडले आहेत. त्यामुळे कोणालाही ऑनलाइन शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी वेळ पनाही. विद्यापीठाने तयार केलेली यंत्रणा महाविद्यालयापर्यंत न पोहोचल्याने संलग्न महाविद्यालयांनी झूम, गुगल मीट सारख्या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग  सुरू केले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने तयार केलेल्या यंत्रणेचा सर्वांना उपयोग होणार आहे की निवडक महाविद्यालयांपूरती ही यंत्रणा सिमीत  राहणार आहे, अशी चर्चा विद्यापीठ वर्तुळात केले जात आहे.------------------------------------ऑनलाइन शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांना येणाऱ्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत करण्यात आला होता.विद्यापीठाने हा कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. जर कक्ष स्थापन झाला नसेल तर याबाबत पाठपुरावा केल्या जाईल.- राजेश पांडे, सदस्य, व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षणonlineऑनलाइनcollegeमहाविद्यालय