पुणे पोलिसांकडून धडाकेबाज 'कॉबिंग ऑपरेशन': एका रात्रीत १२१३ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 08:06 PM2020-12-16T20:06:23+5:302020-12-16T20:27:12+5:30

यापुढे देखील कारवाई सुरू राहणार..

'Cobbing operation' by Pune police: 1213 criminals were killed in one night | पुणे पोलिसांकडून धडाकेबाज 'कॉबिंग ऑपरेशन': एका रात्रीत १२१३ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

पुणे पोलिसांकडून धडाकेबाज 'कॉबिंग ऑपरेशन': एका रात्रीत १२१३ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती

Next
ठळक मुद्देशहरातील गुन्हेगारीचे उच्छाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती ३२८ गुन्हेगारी टोळीतील सराईतांची तपासणी5 पिस्तुले, ४९ कोयते, तलवारी जप्त : गांजा, एमडी हस्तगत

पुणे : शहरातील गुंडगिरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण शहरात पोलिसांनी एकाच वेळी कॉबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांची झाडझडती घेतली. या कारवाईत पोलिसांनी १२१३ गुन्हेगार एकाच रात्री तपासले. यावेळी केलेल्या कारवाईत शहरात आलेल्या ९ तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. गुन्हेगारांकडून ५ पिस्तुले, ४० कोयते, ५ तलवारी, कुलरी, पालघन, सुरा अशी ४९ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. संपूर्ण शहरात एकाचवेळी व इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच अशाप्रकारची ही कारवाई झाली आहे.

मंगळवारी रात्री ९ ते रात्री १ वाजेपर्यंत सर्व शहरात केलेल्या या कारवाईची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, लक्ष्मण बोराटे उपस्थित होते. या कारवाईत पाचही परिमंडळ व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त, १२ सहायक आयुक्त, ३० पोलीस ठाण्याचे निरीक्षक व त्यांचे कर्मचारी, गुन्हे शाखेची १० पथके, २८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी भाग घेतला.

या कारवाईत पोलिसांकडे असलेल्या रेकॉर्डवरील १२१३ गुन्हेगारांना तपाण्यात आले. त्यापैकी ५७२ गुन्हेगार मिळून आले. त्यामध्ये खास करून ‘टॉप २०’ असे ३७२ गुन्हेगार तपासले. त्यामध्ये २१५ गुन्हेगार आढळले. तसेच, परत गुन्हे करणारे ५३० आरोपी तपासले. खून व खूनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात पॅरोल सुटलेले १२१ आरोपी तपासले असता त्यापैकी ७३गुन्हेगार आढळून आले आहेत, पाहिजे असलेले १९० गुन्हेगारांचा शोध घेतला असता त्यापैकी २ जण पोलिसांना सापडले. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५ पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
..............

३२८ गुन्हेगारी टोळीतील सराईतांची तपासणी
शहरातील विविध टोळ्यांमधील रेकॉर्डवर असलेल्या ३२८ गुन्हेगारांची खंडणी विरोधी पथकाकडून तपासणी करण्यात आली. तसेच वाहन चोरी व दरोडा प्रतिबंधक विभागाने वाहनचोरीतील ४९ आरोपींची तपासणी केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत भारती विद्यापीठ परिसरात गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. तर, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ ग्रॅम एमडी जप्त केला आहे. तसेच, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तीन महिलांची सुटका केली.

..........
शहरातील गुन्हेगारीचे उच्छाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. क्राईम रेकॉर्ड अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सॅव्हिलन्स अधिकार्याची नेमणूक केली आहे. त्यातूनच या रेकॉर्डच्या आधारे गेल्या ५ वर्षातील तडीपार केलेल्या गुन्हेगारांची तपासणी या कारवाईच्या वेळी करण्यात आली. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार आहे.

अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त पुणे शहर

Web Title: 'Cobbing operation' by Pune police: 1213 criminals were killed in one night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.