शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पुण्यात पीएमपीएमएल बसेसचा  सीएनजी पुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 1:34 PM

गेल्या अनेक दिवसापासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळेवर दिली जात नसल्याने आजमितीस सुमारे रुपये ४७.२२ कोटी थकबाकी शिल्लक आहे. 

ठळक मुद्देएमएनजीएलचा निर्णय : रुपये ४७.२२ कोटी थकबाकी ;१२३५ सीएनजी बसेस पडणार बंद  पीएमपी दररोज सुमारे ६० हजार किलो पुरवठा

पुणे : पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कणा असलेल्या पीएमपीएल ला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चा पुरवठा आज मध्यरात्रीपासून (दि.२४ मे) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जीवनवाहिनी असणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यातील सीएनजीवर चालणा-या १ हजार २३५ बसेस बंद पडणार आहेत. मागील २ वर्षांपासून असलेली थकबाकी आजमितीस रुपये ४७.२२ कोटीपर्यंत पोहोचली आहे. एमएनजीएलकडून वेळोवेळी पत्रव्यवहार केला असूनही थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएमएल कडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, सरव्यवस्थापक सुजित रुईकर, मुख्य वाणिज्यिक अधिकारी एस.चंद्रमोहन, मुख्य व्यवस्थापक (वाणिज्य) मयुरेश गानू, सरव्यवस्थापक (मार्केटिंग) मिलिंद ढकोले आदी उपस्थित होते.  सुप्रियो हलदर म्हणाले, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा गेल इंडिया लिमिटेड व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन  यांचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनी मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे भाग भांडवल गुंतवलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसना सीएनजीचा पुरवठा एमएनजीएल मार्फत केला जातो. गेल्या अनेक दिवसापासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळेवर दिली जात नसल्याने आजमितीस सुमारे रुपये ४७.२२ कोटी थकबाकी शिल्लक आहे. संतोष सोनटक्के म्हणाले, एमएनजीएलतर्फे वारंवार शासनाच्या सर्व स्तरांवर पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याबाबत कोणताही समाधानकारक प्रतिसाद किंवा कार्यवाही झाली नाही. त्याबाबत पीएमपीएमएल कडून प्रत्येकवेळी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मिळणाºया अनुदानाची थकबाकी असल्याचे कारण सांगण्यात येते. त्यामुळे पीएमपीएमएल कडून एमएनजीएलला मिळणारी रक्कम म्हणजेच थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. पयार्याने एमएनजीएलची इतरांची व बँकेची देणी वाढत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा बंद करण्यात येत आहे. जोपर्यंत संपूर्ण थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत हा पुरवठा सुरु करण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगिताले.... पीएमपी दररोज सुमारे ६० हजार किलो पुरवठा होतो. दररोज त्याचे ३० लाख बिल होते. दर महिना १० कोटी रुपये होतात. त्यापैकी कमी रक्कम दरमहा दिली जाते.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका