पुण्यात ढगाळ वातावरण; हवामान विभागाचा अंदाज खरा, तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:31 PM2018-02-07T12:31:42+5:302018-02-07T12:34:31+5:30

कर्नाटक ते मध्य महाराष्ट्र दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज रविवारी हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे.

Cloudy atmosphere in Pune; Weather Department's predictable | पुण्यात ढगाळ वातावरण; हवामान विभागाचा अंदाज खरा, तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा

पुण्यात ढगाळ वातावरण; हवामान विभागाचा अंदाज खरा, तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे आणि परिसरात कालपासून निर्माण झाले ढगाळ वातावरणकर्नाटक ते मध्य महाराष्ट्र दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस

पुणे : पुणे आणि परिसरात कालपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी पाऊसदेखील पडला आहे.
कर्नाटक ते मध्य महाराष्ट्र दरम्यान निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज रविवारी हवामान खात्याने व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. पुण्यात हडपसर, खडकवासला तसेच येरवड्याच्या काही भागांत पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच नागरिकांना पावसाळ््याचा अनुभव येत आहे. काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. आजही ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Cloudy atmosphere in Pune; Weather Department's predictable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.