माजी नगरसेवकासह लिपिक अटकेत
By Admin | Updated: December 12, 2014 00:09 IST2014-12-12T00:09:06+5:302014-12-12T00:09:06+5:30
चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींचा जामीन करून देण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकानेच मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
माजी नगरसेवकासह लिपिक अटकेत
पुणो : चुलत भावाच्या खुनाच्या प्रकरणात येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींचा जामीन करून देण्यासाठी सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिकानेच मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक तानाजी निम्हण आणि वरिष्ठ लिपिक दीपक ज्ञानोबा राऊत (वय 51, रा. कसबा पेठ) याला अटक केली आहे. या कामासाठी राऊत याने निम्हणकडून तब्बल 15 लाख रुपये घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
तानाजी निम्हण यांची मुले तुषार आणि चेतन या दोघांनी चुलत भाऊ प्रतीक रामभाऊ निम्हण (वय 19) याचा 12 एप्रिल 2क्13 रोजी रात्री गोळ्या झाडून खून केला होता. या गुन्ह्यात तुषार व चेतन येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. दोघांनाही जामीन मिळत नसल्यामुळे शेवटी तानाजी निम्हण यांनी न्यायालयामधील वरिष्ठ लिपिक राऊत याला हाताशी धरले. मुलांच्या जामिनाचा बनावट आदेश तयार करून त्यावर न्यायालयाचा सही-शिक्का देण्यासाठी त्याने 15 लाख रुपये घेतले. राऊत याने न्यायालयाच्या संगणकातील अन्य गुन्ह्यांमधील जामिनाचा मजकूर जसाच्या तसा ‘कॉपी-पेस्ट’ करून आरोपींच्या जामिनाचा नवीन आदेश तयार केला. त्यावर आरोपींची नावे टाकून दस्त तयार केला. या सर्व कागदपत्रंवर न्यायालयाचा सही व शिक्का मारून तयार केलेला जामीन आदेशाचा 2क् नोव्हेंबरच्या तारखेचा लखोटा स्वत: तानाजी यांच्यासोबत जाऊन 22 नोव्हेंबरला येरवडा कारागृहात टाकला. त्याआधारे आरोपींचा जामीन करवून घेतला. येरवडा कारागृहामधील काही अधिकारी आणि कर्मचा:यांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे, वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांनी गुरुवारी कारागृहामध्ये जाऊन तपास केला. (प्रतिनिधी)
4बनावट जामीन करुन देण्यासाठी न्यायालयाची फसवणूक करुन दीपक राऊतने तानाजी निम्हणकडून पंधरा लाख रुपये घेतले. ही रक्कम त्याने पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईमधील डान्स बारमध्ये उडवल्याचे निरीक्षक पवार यांनी सांगितले. न्यायालयातील डय़ुटी संपल्यानंतर राऊत मित्रंना फोन करुन बोलावून घेत असे. खासगी मोटारीने हे सर्वजण डान्सबारमध्ये जात असत. तेथे मौजमजा करुन सकाळी पुन्हा परत येत असत. पंधरा लाख रुपये खर्च होईर्पयत दोन महिने राऊतची ‘जिवाची मुंबई’ सुरू होती.