शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘कचरा’वाला’ नव्हे; ‘स्वच्छता’दूतच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 18:38 IST

रेड डॉट कॅम्पेन : कचरावेचकांच्या कामाचा सन्मान होणार कधी?

ठळक मुद्देशहराची स्वच्छतेची खरी धुरा या कचरावेचकांवरच अवलंबून दारोदार जमा झालेल्या ओल्या सुक्या कचऱ्याचे निम्म्यापेक्षा जास्त विघटन कचरा वेचकांकडून पुणे शहरात सुमारे ४ हजार कचरावेचक नित्यनियमाने घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात

नीलेश राऊत -  पुणे : कचरावेचकांकडून घराची बेल वाजल्यास, घरातील सदस्यांकडून कचऱ्याची बकेट दाराबाहेर ठेवली जाते. ही बकेट देताना कचरावेचकास कचरावाला म्हणून संबोधताना, तो ‘कचरावाला’ नसून हाच आपल्यासाठी ‘स्वच्छतादूत’ आहे हेच आपण विसरत चाललो आहोत. स्वत: दिवसभर कचऱ्यात काम करून दुसऱ्याला स्वच्छतेचा आनंद देणाऱ्या या कचरासेवकांचा नव्हे, स्वच्छतादूतांचा सन्मान ओला-सुका व सॅनिटरी कचरा वेगळा करून तरी ठेवला जावा, एवढीच माफक अपेक्षा या कचरा वेचकांची आहे. ‘रेड डॉट कॅम्पेन’च्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्ताने औंध येथे एकत्र आलेल्या कचरा वेचकांनी आपल्या व्यथा मांडल्या़ यामध्ये शहरात फिडर पॉइंटवर कुत्री, मांजरी, घुशी यांचा त्रास होतो. घंटागाडीत सॅनिटरी कचºयासाठी वेगळी व्यवस्था नाही़ ओला कचराही प्लॅस्टिकमध्ये भरून तो कचरा बकेटमध्येच ठेवला जातो, सॅनिटरी नॅपकिन, ड्रायपर कचरा पेटीत ठेवल्याने तेही हाताने वेगळे करावे लागतात.  अशा नित्याने सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांना कुठे तरी पर्याय मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली. पुणे शहरात सुमारे ४ हजार कचरावेचक नित्यनियमाने घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. वर्षोनुवर्षे आपली सेवा बजाविणाऱ्या कचरावेचकांना आजमितीला प्रतिघरटी ६५ रुपये घेण्याचा अधिकार दिला आहे़. तरीही हे पैसे देताना  घासाघीस होतेच. कचरा गोळा करताना सांडला गेला, बकेटमध्ये थोडा उरला होता, अशी दुसनी त्यांना सुनावली जातात. प्रत्यक्षात आपण कचरा दिल्यावर तो कचरा डेपोपर्यंत जाईपर्यंत त्याची हाताळणी या कचरावेचकांकडून होत असताना त्यांना होणाऱ्या यातनांची, आरोग्याच्या समस्यांची नोंद कुठेही होत नाही. ........एक दिवस जरी कचरावेचक आला नाही तर आपण सर्वजण कचरावेचकांच्या नावाने ओरड सुरू करतो. परंतु, या कचरावेचकांच्या कामाचा सहानुभूतीने कधीही विचार आपणाकडून अथवा प्रशासकीय पातळीवर पाहिजे तेवढा होत नाही़ .शहराची स्वच्छतेची खरी धुरा या कचरावेचकांवरच अवलंबून आहे. हेच आपण विसरत चाललो असून, आजही त्यांना दुय्यम स्थान देऊन दुर्लक्षित केले जात आहे. ...........दारोदार जमा झालेल्या ओल्या सुक्या कचऱ्याचे निम्म्यापेक्षा जास्त विघटन याच कचरा वेचकांकडून होत असते. हा कचरा वेगळा करताना अनेकदा त्यातील प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या, लोखंडी तुकडे, कचकड्याच्या वस्तू या वेचकांकडून वेगळ्या करून विकल्या जातात. यातून त्यांना थोडाफार आर्थिक फायदा होतही असेल, परंतु हे करीत असताना त्यांना पूर्ण कचरा हाताने वेगळा करावा लागतो. यामध्ये ड्रायपर, सॅनिटरी नॅपकीन, ओला कचरा, खरकटे अन्न हे नित्याने हाताळावे लागतात. परिणामी अनेकांना त्वचारोगालाही सामोरे जावे लागत असून, इतर आजारांचाही ससेमिरा त्यांच्या पाठी लागला आहे. 

टॅग्स :PuneपुणेGarbage Disposal Issueकचरा प्रश्नHealthआरोग्यPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका