शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडी टोलवर पुन्हा राडा; परस्पर विरोधी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 16:47 IST

पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडीच्या टोलनाक्यावर स्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

ठळक मुद्देस्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात राडा, पोलिसांनी दाखल केले गुन्हेसकाळी काही तास बंद होता टोलनाका

आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावरील चाळकवाडीच्या टोलनाक्यावर स्थानिक आणि टोलकर्मचारी यांच्यात पुन्हा एकदा राडा झाला. तालुक्यातील वाहनांना टोल माफ असताना टोल मागितल्याने झालेल्या वादविवादात टोल कर्मचारी यांनी मारहाण करून सोन्याची चैन हिसकावून घेतल्याची तर कर्मचारी यांना मारहाण व दागिने हिसकावून घेतल्याच्या परस्पर विरोधी फिर्यादी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.  आळेफाटा पोलिसांत संदीप प्रभाकर मुळे (रा. मांजरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व इतर सहकारी हे आळेफाटा येथून नारायणगाव बाजूला जात असताना रविवारी रात्री आठच्या सुमारास चाळकवाडी टोलनाक्यावर गर्दी लवकर काढायला सांगत व स्थानिक असल्याचा पुरावा दिल्यानंतरही टोल मागणी केली. या कारणाने तेथील पाच कर्मचारी व इतर यांनी गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व वाहनाचे नुकसान केले. तर संतोष अनंथा सोनवणे (रा. चाळकवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी रात्री आठच्या वेळेला टोलनाक्यावर नारायणगावकडे जाणारे संदीप मुळे यांचे वाहनाला टोल मागितल्याच्या कारणाने त्यांनी व इतर यांनी दोन तोळे सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून घेत मारहाण केली. टोलनाक्यावरील या प्रकरानंतर ग्रामस्थांनी तेथील टोलनाक्यावर आंदोलन करत टोल नाका काही वेळ बंद केला. तर शिवसेना गटनेत्या आशा बुचके, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, नारायणगाव सरपंच योगेश पाटे यांनी आळेफाटा पोल१स ठाण्यात टोलनाक्यावरील कर्मचारी यांच्याबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. दरम्यान याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण व दरोडा हे गुन्हे दाखल केले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक मारूती खेडकर पुढील तपास करत आहे. तर सकाळी काही तास हा टोलनाका बंद होता. याबाबत माहिती समजू शकली नाही. 

टॅग्स :PuneपुणेShiv Senaशिवसेना