'आम्ही गोट्या खेळत होतो का?' पुण्यात भर कार्यक्रमातच आजी-माजी आमदार भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 06:39 PM2022-01-05T18:39:40+5:302022-01-05T18:48:01+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर अरेरावी केल्याची घटना घडली आहे

clash between junnar ncp mla atul benke and shivsena leader sharad sonavane | 'आम्ही गोट्या खेळत होतो का?' पुण्यात भर कार्यक्रमातच आजी-माजी आमदार भिडले

'आम्ही गोट्या खेळत होतो का?' पुण्यात भर कार्यक्रमातच आजी-माजी आमदार भिडले

Next

पुणे:पुणे जिल्ह्यात आज आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात हमरीतुमरीवर उतरल्याचे दिसले. महाविकास आघाडीतील बिघाडीचा आणखी एक अंक समोर आल्याचे दिसले. पुण्याच्या जुन्नर परिसरात हा लाजिरवाणा प्रकार घडल्याने पुणे जिल्ह्यात याची मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके (atul benke) आणि माजी आमदार शरद सोनवणे (sharad sonavane) यांनी एकमेकांवर अरेरावी केल्याची घटना घडली आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतील कामाचे श्रेय घेण्यावरून हा वाद रंगल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बेनके यांनी या कार्यक्रमाला शिवसेनेला डावलले होते. मुख्यमंत्र्यांच्या नावाने असणाऱ्या योजनेला शिवसेनेला आमंत्रण नव्हते. हे पाहून माजी आमदार सोनवणेंनी त्या कार्यक्रमात बेनकेंच्या आधी उपस्थिती लावली. काही वेळाने बेनके आले आणि दोघे जवळच बसले.

तेंव्हा सोनवणेंनी श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत, बेनके यांच्या हाताला स्पर्श करत जाब विचारला. यावरून बेनके अचानक संतापून मला हात लावायचा नाही म्हणाले. त्यावर मी फक्त स्पर्श केलाय, तुम्हाला पटत नाही तर मग माझ्या बाजूला कशाला बसले, असं सोनवणे म्हणाले. यानंतर हे दोन्ही आजी-माजी आमदार भर कार्यक्रमात सर्वांदेखत हमरीतुमरीवर आले.

Web Title: clash between junnar ncp mla atul benke and shivsena leader sharad sonavane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.