शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

एक मताने विजयी शरद लेंडेंच्या विरोधात दावा

By admin | Updated: March 12, 2017 03:15 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक मताने विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांच्या विरोधात पराभूत शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांनी सत्र न्यायालयात

नारायणगाव : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक मताने विजयी झालेले राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांच्या विरोधात पराभूत शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांनी सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे, अशी माहिती काकडे यांचे वकील अ‍ॅड. योगेश जाधव यांनी दिली़ दरम्यान, न्यायालयाने दि़ २१ मार्च २०१७ ही तारीख दिली असून, या तारखेला निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका मांडणार व कोर्ट पुढे काय निर्णय देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ अ‍ॅड. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीत आळे-पिंपळवंडी गटातील निवडणूक अटीतटीची झाली होती़ या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे हे एक मताने पराभूत झाले होते़ या निर्णयप्रक्रियेत खेड येथील सत्र न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. काकडे यांच्या वतीने पोस्टल बॅलेट मतदानावर हरकत घेण्यात आली आहे़ मतमोजणीच्या वेळी हरकत फेटाळून राष्ट्रवादीचे उमेदवार शरद लेंडे यांना एक मताने विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे़ निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पोस्टल मतदान बाद करणे अपेक्षित असताना ते बाद न करता ग्राह्य धरल्याने पिटीशन दाखल करण्यात आले आहे़ इलेक्शन कमिटीच्या नियमानुसार पोस्टल बॅलेट वोटमध्ये फरक दिसून येत आहे. काही मतपत्रिकांवर स्टॅम्प नाही, आयडीएनटी कार्ड घेण्यात आलेले नाही, काही मतपत्रिकांवर शिक्के, सह्या नाहीत़ मतदान अनुक्रमांक चुकीच्या पद्धतीने आहे़ त्या मतपत्रिका बाद धरण्यात याव्यात, अशा स्वरूपाचे इलेक्शन पिटीशन कोर्टात दाखल करण्यात आले आहे़ न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी दि. २१ मार्च २०१७ ही तारीख दिलेली आहे.