शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्याकडे दुर्लक्ष, वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 3:29 AM

व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.

- अभिजित डुंगरवालबिबवेवाडी  - व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक वर्षांपासून या भागातील या रस्त्यावरून प्रवास करणारे लाखो नागरिक हा त्रास सहन करीत आहेत.पुणे-स्टेशनपासून कात्रज-कोंढवा रस्त्याला जोडणारा हा ८० फुटी रस्ता आईमाता मंदिरापासून व्हीआयटी चौकापर्यंत फक्त २० फुटी शिल्लक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनीराजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभारण्यात आलेले मंगलकार्यालयाचे पार्किंग व गोडाऊन यामुळे या रस्त्याला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. पालिकेचा बांधकाम विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातील एकाही अधिकाऱ्यामध्ये हे धाडस नाही, की ते या प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकतील व आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतील.या प्रत्येक अतिक्रमणामध्ये राजकीय नेते व अधिकारी यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, म्हणूनच रस्त्यावरील एकाही मंगलकार्यालय किंवा गोडाऊनवर कारवाई करून रस्ता मोकाळा करून दाखवण्याचे धाडस पालिकेचे अधिकारी दाखवत नाहीत हे या भागातील वास्तव आहे.पालिकेला आता नवीन आयुक्त येणार आहेत. त्यांनी तरी येथील राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी न पडता, येथील प्रत्येक नागरिकाशी निगडित असलेला हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी येथील लाखो सामान्य नागरिक करीत आहेत.वाहतूक पोलीस पावती फाडण्यासाठीचया रस्त्यावर सहकारनगर वाहतूक विभागाचे चार-पाच कर्मचारी दिवसभर उभे असतात, मात्र ते येथील वाहतूककोंडी सोडवायची सोडून वरिष्ठांकडून आलेले पावतीचे टार्गेट पूर्ण करण्यामध्येच व्यस्त दिसतात. वाहतूक विभागाने पुण्यातील सर्वात मोठा वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पावती फाडण्यासाठी वेगळे पोलीस व वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वेगळे पोलीस अशी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. तरच पुण्यातील वाहतूककोंडी सुटण्यामध्ये वाहतूक पोलिसांचा हातभार लागेल.कोर्टातील स्टेवर आयुक्तांनी लक्ष द्यावेया भागातील अनेक गोडाऊनवाल्यांनी कोर्टात जाऊन अतिक्रमणे पाडू नये यासाठी स्टेचा आधार घेतलेला आहे. कोर्टाचा स्टे असल्यामुळे अतिक्रमण विभागाला कारवाई करता येत नाही. मात्र हा गोडाऊन उभारलेला भाग हिल टॉप-हिल स्लोप आहे.कायद्याप्रमाणे या भागात एक हजार फुटाच्या भूखंडावर फक्त ४० फूट बांधकाम करता येते, तेही प्लॅनपास केल्यावर. त्यामुळे पहिल्याच तारखेला अनधिकृत रस्त्यावर गोडाऊन बांधणाºयाचा स्टे उठणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नाही.तारीख पे तारीख पुढे सुरू आहे. स्टेच्या विरोधात पालिकेने पूर्ण ताकदीने आता कोर्टासमोर बाजू मांडणे आवश्यक आहे. तरच या भागातील नागरिकांना न्याय मिळणार आहे. तसेच ज्यांनी मुख्य रस्त्यावर अनधिकृत बांधकामे, गोडाऊन केले आहेत त्यांच्याकडून कारवाईचा खर्च व दंड वसूल करणेदेखील अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीnewsबातम्या