देशव्यापी बंदच्या प्रचारासाठी नागरिक कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:38 IST2020-11-22T09:38:58+5:302020-11-22T09:38:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: केंद्र सरकारचा निषेध म्हणून देशातील कामगार व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदच्या प्रचारासाठी ...

देशव्यापी बंदच्या प्रचारासाठी नागरिक कृती समिती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: केंद्र सरकारचा निषेध म्हणून देशातील कामगार व शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदच्या प्रचारासाठी पुण्यातील विविध संघटनांनी नागरिक कृती समितीची स्थापना केली आहे. येत्या सोमवारी (दि. २३) पुण्यात शेतकरी, कामगार, कारागिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
समितीचे निमंत्रक नितिन पवार, दगड खाण कामगारांचे नेते अॅड. बस्तू रेगे, लोकायतच्या अॅड. मोनाली अपर्णा,शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी ही माहिती दिली. प्रसिद्ध लेखिका प्रतिमा इंगोले, कामगार संघटना राज्य कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी, तर विद्रोही संस्कृतिक चळवळीचे नेते धनाजी गुरव परिषदेत बोलणार आहेत. जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव अध्यक्षस्थानी असतील.