शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील शाळांची घंटा आज वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र, पुणे महापालिकेने ...

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र, पुणे महापालिकेने शहरातील शाळा येत्या १ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पालिकेने व खासगी शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्याबाबत आवश्यक तयारी केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळपत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात प्रॅक्टिकलसाठी विद्यार्थी येत आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये काही प्रमाणात वाढ होत आहे.

पालिकेने येत्या १ फेब्रुवारीपासून आपल्या हद्दीतील शाळा सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी शासन निर्णयानुसार शिक्षकांची कोरोना तपासणी झाल्याशिवाय शाळा सुरू करता येत नाहीत. अद्याप शहरातील सर्व शाळांमधील शिक्षकांची कोरोना तपासणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे सोमवारी शहरातील सर्व शाळा सुरू होणार नाहीत. पुढील आठवड्याभरात सर्व शाळा सुरू होतील, असे पालिकेच्या शिक्षणाधिका-यांनी सांगितले.

--------------------------

ग्रामीण भागातील शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या आहे. पुढील काही दिवसात त्यात आणखीन वाढ होईल. ग्रामीण भागातील शाळांचा अनुभव लक्षात घेता आता शहरातील शाळा सुरू होण्यास कोणतीही हरकत नाही.

- महेंद्र गणपुले, प्रवक्ता, मुख्याध्यापक संघ

------------

दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिकांसाठी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थी उपस्थितीबाबत पालक सकारात्मक आहेत. शिक्षकांच्या कोरोना तपासणीनंतर पुढील आठवड्याभरात शहरातील सर्व शाळा सुरू होतील.

- एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी