शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गणेशोत्सवात पहाटे ४ पर्यंत शहर होणार चकाचक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 6:51 PM

गणेशोत्सवाच्या काळात प्रत्येक भागात ही स्वच्छता होती किंवा नाही यासाठी वरिष्ठ अधिकारी मध्यरात्री दौरा करून पाहणी करणार आहेत.

ठळक मुद्दे'' नाईट व्हिजीट'' मध्ये अस्वच्छता आढळल्याने ठेकेदाराला दहा हजारांचा दंड

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात प्रामुख्याने शहराच्या मध्यवस्तीमध्ये स्वच्छतेसाठी खास अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शहरामध्ये दोन शिफ्टमध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असून, पहाटे ४ वाजेपर्यंतच शहर चकाचक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी महापौरासह आयुक्त सौरभ राव व सर्व विभाग प्रमुख शहराच्या स्वच्छतेसाठी मध्यरात्री नाईट व्हिजीट करुन पाहणी करणार असल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली.     उत्सवकाळात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरते. ती अस्वच्छता तातडीने दूर करण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. तीन पाळ्यांमध्ये स्वच्छतेच्या कामांचे नियोजन केले असून, रात्रीच्या वेळी दोन पाळ्यांमध्ये काम होणार आहे. यामध्ये कसबा पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजीनगर आदी परिसरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छता करण्यासाठी तब्बल ५५० ते ६०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मार्फत रात्री १२ नंतर देखावे बंद झाल्यावर त्वरीत स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येक भागात ही स्वच्छता होती किंवा नाही यासाठी वरीष्ठ अधिकारी मध्यरात्री दौरा करून पाहणी करणार आहेत.    ----------------------पहिल्याच दिवशी दहा हजार रुपयांचा दंड गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महापौर मुक्ता टिळक आणि आयुक्त सौरभ राव यांनी मनाचे पाच गणपती आणि मंडई परिसरामधील स्वच्छतेची पाहणी केली. यामध्ये मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. यामुळे आयुक्तांनी तातडीने संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे व नियमित स्वच्छता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंडई परिसराची स्वच्छता करण्याची जबाबदारी असलेल्या मे.बाप्पू एन्टप्रायजेस यांना तब्बल १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेश महोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMukta Tilakमुक्ता टिळकSaurabh Raoसौरभ राव