शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या वीज बिलांतील वाढ नागरिकांची ठरतेय डोकेदुखी; समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 14:42 IST

तक्रारी घेऊन गेलेल्या ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची आली वेळ

ठळक मुद्देवीज बिलं आहेत की खंडण्या ? मनसेचा संतप्त सवाल

पुणे : वाढीव वीज बिलांमुळे नागरिकांना झटका बसला असून कोरोनामुळे आर्थिक चणचणीत असलेल्या नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मीटर रिडींगनुसार बिले दिल्याचा दावा करणाऱ्य वितरणकडून ग्राहकांना समाधानकर उत्तरे मिळत नसून तक्रारी घेऊन गेलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. वास्तविक बिलांमधील वाढ दरवाढीमुळे आणि लॉकडाऊनच्या काळातील अतिरीक्त वीज वापरामुळे झाल्याचे कारण दिले जात आहे. एकंदरीतच नागरिकांमध्ये असंतोष आणि नाराजी असल्याचे दिसत आहे. घरगुती वापराची बिले ग्राहकांच्या अंदाजापेक्षा अधिक आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मार्च ते जूनदरम्यान उन्हाळ्यामुळे तसेच लॉकडाऊनमुळे घरातील वीज वापर वाढल्याचे आणि 1 एप्रिलपासून  वीज दरवाढ झालेली असल्याने वाढीव बिले दिले गेल्याची माहिती महावितरणकडून देण्यात येत आहे. नागरिकांना वीज युनिटच्या वाढलेल्या दरांबाबत माहितीच नसल्याने सगळा गोंधळ उडाला आहे. लॉकडाऊन असल्याने छापील बिले पाठविणे आणि मीटर रिडींग घेणे बंद होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांच्या सरासरी वापरावरुन सरासरी बिले पाठविण्यात आली होती. काही नागरिकांनी त्यातील रकमा भरल्या. परंतु, लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मीटर रिडींग घेऊन पाठविण्यात आलेल्या बिलांमध्ये दरवाढीच्या फरकाने आणि सरासरीपेक्षा अधिक वापर झालेल्या रकमा समाविष्ट करुन अधिक रकमेची बिले पाठविण्यात आली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा वीज वापरच एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम असल्याने अधिक वीज वापरली गेल्याचे महावितरणकडून देण्यात आलेले कारण चुकीचे असून हा मुद्दाच गैरलागू आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी असे मत जाहीर प्रकट करणे म्हणजे नागरिकांचा अपमान असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सांगितले. महावितरण ही कंपनी होण्यापुर्वीपासूनच लोकांना लुटण्याचाच स्वभाव राहिलेला आहे.  एमएसईबीचे दोन कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यावर तरी सेवा देण्यात सुधारणा आवश्यक होती; परंतू ती सुद्धा झालेली नाही. नागरिकांना वाढीव रकमांची बिले दिली गेली आहेत. त्याची दुरुस्ती कोणत्याही कारणाशिवाय होणे अपेक्षित असताना आपण दिलेली बिलेच योग्य आहेत असे सांगणे म्हणजे जनतेवर दाखविण्यात येत असलेला अविश्वास असल्याचे कुंभार म्हणाले. =========== महाराष्ट्र विद्यूत नियामक आयोगाने 30 मार्च रोजी दरवाढीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 1 एप्रिल पासून नवीन वीजदर लागू करण्यात आले आहेत. ही दरवाढ लॉकडाऊन संपेपर्यंत का स्थगित ठेवण्यात आली नाही अशी विचारणा केली जात आहे. बिलांची रक्कम  तीन हप्त्यात भरण्याची परवानगी दिली असली तरी दरमहा नवीन दरांनुसार येणारे बील आणि हप्ता असे समाविष्ठ बिलही मोठ्याच रकमेचे असणार आहे. ==========वीजबिलं आहेत की खंडण्या?, मनसेचा सवालवीज ग्राहकांना महावितरणकडून वाढीव बिलाचे झटके दिले जात आहेत. त्यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. 'वीज बिल माफी झालीच पाहिजे.' अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक आर्थिक अडचणीत आले आहेत. सर्वसामान्य आर्थिक अडचणीत आलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने वाढीव वीज बिल आकारणी करून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा भुर्दंड दिला आहे. वीज बिले आहेत कि खंडण्या? असा सवाल मनसेने केला. सद्यस्थितीत रोजगार आणि व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. घटत चाललेले उत्पन्न यामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले सरसकट माफ करावीत अशी लेखी मागणी मनसेतर्फे करण्यात आलेली आहे. यावर निर्णय होईपर्यंत महावितरणने नागरिकांमागे वसुलीचा तगादा लावून त्यांच्या मीटरला हात लावला तर मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल असा इशारा देण्यात आला. नागरिकांनीही वीज बिले भरु नयेत असे आवाहन मनसेने केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकारNitin Rautनितीन राऊत