बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 16:41 IST2019-07-29T16:38:59+5:302019-07-29T16:41:37+5:30
भरधाव वेगाने जाणाऱ्या कापुस भरलेला माल वाहतूक ट्रक अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाला.

बारामती-पाटस रस्त्यावर नागरिकांनी अनुभवला '' बर्निंग ट्रक'' चा थरार
बारामती: बारामती-पाटस रस्त्यावर सोमवारी(दि २९) वाहनचालक आणि नागरिकांनी बर्निंग ट्रक चा थरार अनुभवला. भरधाव वेगाने जाणाऱ्या कापुस भरलेला माल वाहतूक ट्रक उंडवडी सुपे गावच्या हद्दीतील जानाई मळ्याजवळ अचानक पेट घेतल्याने जळुन खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. माल ट्रकने (क्रमांक एम.पी ०९ एच.एच ७८५१) आज (सोमवारी ) पहाटे पाचच्या सुमारास पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने जात असताना अचानक उंडवडी सुपे येथे आल्यानंतर भर रस्त्यातच पेट घेतला.मात्र,ट्रकचालकाला याची माहिती नव्हती.त्यामुळे रस्त्यावरुन पेटलेला ट्रक धावत होता.सुदैवाने यावेळी ट्रक पेटल्याचे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या इतर वाहन चालकांनी आपली वाहने थांबवून संबंधित ट्रक चालकाला इशारे करुन सांगितले.
