शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

आता हात टेकले बा तुमच्यापुढं! अतिआवश्यक सेवेचा देखील फायदा घेत लोकं रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 20:11 IST

लोकांना कितीही सांगा, ऐकत नाहीत

ठळक मुद्देअतिआवश्यक सेवेचे स्टिकरचा होतोय दुरुपयोग

पुणे : डॉक्टरकडे निघालो आहे, औषध आणायला जातो आहे. घरातील सर्व किराणा संपला आहे, साहेब सिलेंडर घेऊन येतो, असे खोटी एकापेक्षा एक कारणे देऊन नागरिक बाहेर पडत आहेत. इतकेच नव्हे तर अत्यावश्यक सेवेसाठी तयार करण्यात आलेले स्टिकर लावून त्याचा दुरुपयोग होताना दिसून आले आहेत. यात काही बहाद्दर मागील वषीर्चे प्रिस्क्रिप्शन घेऊन घराबाहेर पडत आहेत. सगळे एकच वेळी किराणा माल घेत आहेत, मित्रांना भेटायला जात आहेत. अत्यावश्यक सेवेच्या स्टिकरचा गैरफायदा घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत कारवाई करणा?्या पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरातच बसा असे आवाहन करून देखील नागरिक बेशिस्तपणा दाखवत घराबाहेर पडू लागले आहेत. यात अनेकांकडून किराणा माल घेण्यासाठी, औषधे खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे कारण सांगितले जात आहे. घरात करमत नाही म्हणून पेट्रोल भरायला जाणे, मित्राकडे जाणे, कंटाळा आला म्हणून बाहेर पडलो असे सांगणे, दूध आणायला चाललो आहे अशी थाप मारने, अशी कारणे नागरिक देत आहेत. विशेष म्हणजे कित्येक वाहनचालक, नागरिक डॉक्टरांकडे जायचे आहे म्हणून बाहेर पडत आहेत. अशा पद्धतीने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिक बाहेर पडून स्वत:च्या व इतरांच्या जीवाला धोका तयार करत आहेत. हा सगळा प्रकार लक्षात घेऊन पोलिसांनी आता बारकोड स्टिकर तयार केले आहेत. काही करून घराबाहेर पडणे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय नागरिक करताना दिसत आहे. एकट्याने गेल्यावर पोलीस मारहाण करतात. म्हणून बहुतांश जण आपल्या पत्नी समवेत घरातून बाहेर निघत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. पोलिसांनी नियमाकडे बोट दाखवल्यानंतर अनेक जण खोडसाळपणा करून ते कसे मोडता येईल यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी कित्येकदा समज दिल्यानंतर देखील नागरिक त्याच चुका पुन्हा करताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणून कुणाला शिक्षा केल्यास त्यावरून देखील पोलिसांना ट्रोल केलं जात आहे. हे चुकीचे असल्याचे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचा?्यांचे म्हणणे आहे. हडपसर मध्ये सोमवारी दुपारी एका मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. त्यांना पकडून समज देण्यात आल्याचे हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी सांगितले. जितकी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यापेक्षा अधिक संख्येने नागरिक बाहेर पडत आहेत. नागरिकांना परिस्थितीचे भान नसल्याने त्यांच्याकडून असे प्रकार होत असल्याची तक्रार पोलिसच नागरिकांविरोधात करू लागले आहेत. ..............

* आपले घर सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल....गाडीवर विशिष्ट स्टिकर चिटकवला म्हणजे पोलीस पाहत नाहीत. ते सोडून देतात. असा नागरिकांचा समज झाला आहे. पोलिसांनी जेव्हा बारकाईने सगळ्या वाहनचालकांची तपासणी केले असता त्यातील अनेकांनी खोटी कारणे सांगून घराबाहेर पडल्याचे दिसून आले. नागरिक अतिरेक करताना दिसत आहेत. ते आमचा गैफायदा घेत आहेत. ज्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेचा स्टिकर आहे अशा व्यक्ती आपल्या नातेवाईकांची वाहतुक करताना आढळले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कडक कारवाई करत आहोत. नागरिकांना हात जोडून विनंती आहे ती म्हणजे त्यांनी घरात थांबणे फायद्याचे आहे. त्यांनी स्वत: स्वत:ची काळजी घ्यायला हवी. नागरिक फार निष्काळजीपणे वागताना दिसत आहे. आपल्या घरात थांबावे. तेच आपले बेस्ट हॉस्पिटल आहे. - प्रसाद लोणारे ( सहायक पोलिस निरीक्षक, हडपसर)

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसState Governmentराज्य सरकार