शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती आडवी येत नाही : बिरदेव डोणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 20:15 IST

नुकत्याच पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत बिरदेव डोणे यांनी ५५१ वा रॅंक मिळवत यश मिळविले.

बारामती : कष्ट, मनाची तयारी असलेल्या कोणत्याही युवकाला स्वप्न पूर्ण करताना त्याची परिस्थिती आडवी येत नाही. माझे कुटुंबीय मेंढपाळ असताना देखील मला यूपीएससी परीक्षेत यश मिळवणे शक्य झाले. मी करू शकतो, तर या देशातला प्रत्येक तरुण का करू शकत नाही, असा आशावाद बिरदेव डोणे यांनी व्यक्त केला.नुकत्याच पार पडलेल्या युपीएससी परीक्षेत बिरदेव डोणे यांनी ५५१ वा रॅंक मिळवत यश मिळविले. मेंढपाळाचा मुलगा अशी ओळख असलेल्या डोणे यांचे सर्वत्र काैतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर डोणे यांचा भारताच्या बेसबॉल महिला संघाच्या कॅप्टन रेश्मा पुणेकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या हस्ते बारामतीत सत्कार करण्यात आला. तसेच, यावेळी डोणे यांचे युवा वर्गासाठी प्रेरक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डोणे यांनी युवकांशी संवाद साधला.यावेळी डोणे म्हणाले, आपण विविध परीक्षा देताना आपल्या कुटुंबातील पालक आपल्या यशाकडे डोळे लावून बसलेले असतात. अनेक पालक सर्वसामान्य कुटुंबातून असतात, त्यांना यूपीएससी परीक्षा कशी होत असते याबद्दल कोणतीच माहिती नसते. बऱ्याच विद्यार्थ्यांना आपण यूपीएससी एमपीएससीसारखी परीक्षा क्रॅक करू शकतो का नाही, हे माहीत असते. मेरिटपासून ५० ते ६० गुणांचा फरक असल्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थी पुण्यासारख्या शहरातून बाहेर पडत नाहीत.अप्रत्यक्षरीत्या ते आपल्या कुटुंबीयांना पालकांना फसवतात, याचे दुःख वाटते. त्यामुळे यूपीएससी स्पर्धा परीक्षा देणे वाईट किंवा चुकीचे नाही, प्रयत्न केलाच पाहिजे. परंतु, यातून योग्य वेळी बाहेर देखील पडता आले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना पाठबळ देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी स्थानिक संयोजकांकडून बिरदेव ढोणे यांच्या ग्रंथालयासाठी २५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली, तसेच त्यांना पुस्तकाचा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड